VIDEO | तीन दिवसाच्या बाळाचा पाळण्यात चालण्याचा प्रयत्न, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
VIRAL VIDEO | हे प्रकरण अमेरिकेतील असल्याचं सांगितलं जात आहे. सामंथा मिटशेल नावाची एक महिलेने कॅनडी न्यूज सांगितलं की, त्यांना ज्यावेळी मुलगी झाली, त्यावेळी त्या मुलीने आपलं डोकं उचललं आणि चालण्याचा देखील प्रयत्न केला आहे.
मुंबई : ज्यावेळी मुलं जन्माला येतं, त्याच्यानंतर 3 महिन्यांनी मुलं पलटी मारायला सुरुवात करतात. त्याचबरोबर सहा महिने ते एक वर्षाने ती मुलं चालायला शिकत असतात. आपल्या मुलाने पहिल्यांदा चालणे हा आईवडिलांसाठी खूप मोठा सुखद धक्का असतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ (VIRAL VIDEO) चांगलाचं व्हायरल झाला आहे. जो व्हिडीओ व्हायरल (trending viral video) झाला आहे. त्याची चर्चा सुध्दा सोशल मीडियावर अधिक आहे. त्या मुलाने ६ महिने नाहीतर, तीन दिवसात चालायला सुरुवात केली आहे. खरंतर हॉस्पिटलमध्ये असताना जन्माला आलेल्या मुलीने तीन दिवसात पलटी मारायला सुरुवात केली. त्याचबरोबर चालायचा सुध्दा प्रयत्न केला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर (trending news in marathi) हा प्रकार तुमच्या सुध्दा लक्षात येईल.
चालण्याचा प्रयत्न सुद्धा करीत आहे
सध्या ज्या मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ अमेरिका देशातील असल्याचं एका वेबसाईटनं म्हटलं आहे. तिथं सामंथा मिटशेल नावाच्या एका महिलेने कॅनडी न्यूजला सांगितलं की, त्यांना मुलगी झाल्यानंतर तीन दिवसांनी ती मुलगी पटली मारत आहे, त्याबरोबर चालण्याचा प्रयत्न सुद्धा करीत आहे.
View this post on Instagram
त्याने माझ्यावर विश्वास ठेवला नसता
मिटशेल यांनी डेली मेलला बोलत असताना सांगितलं की, ज्यावेळी मी पहिल्यांदा रांगताना पाहिलं, त्यावेळी मला मोठा धक्का बसला. यांच्या आगोदर मी कधीचं ३ दिवसात चालण्याचा प्रयत्न करणार मुलं पाहिलं नाही. ज्यावेळी मी हे पाहतं होती. त्यावेळी माझ्यासोबत फक्त माझी आई होती. माझा नवरा सुध्दा त्यावेळी माझ्यासोबत नव्हता. मी जर हे माझ्या नवऱ्याला दाखवलं नसतं, तर त्याने माझ्यावर विश्वास ठेवला नसता.
मिटशेल यांनी हा व्हिडीओ जुना असल्याचं सांगितलं आहे, सध्या त्यांची मुलगी तीन महिन्याची झाली आहे. त्या मुलीची कमाल आहे की, ती सध्या सपोर्ट घेऊन उभी राहत आहे. ही काही साधी गोष्ट नाही.