Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bill Gates : जेव्हा बिल गेट्स पोळ्या लाटतात ? पण पोळी जमलीय का ?

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीत सामील असलेले बिल गेट्स यांनी किचनमध्ये आपला हात आजमावला ही काही फार मोठी गोष्ट नाही. परंतू त्यांनी कोणती डीश बनविली ही बातमी आहे. त्यांनी काय बनवले तर बिहारी रोठी बनवली.

Bill Gates : जेव्हा बिल गेट्स पोळ्या लाटतात ? पण पोळी जमलीय का ?
rotiImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 5:19 PM

नवी दिल्ली : असे म्हणतात माणसाला खूष ठेवण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जात असतो. जेवण बनविणे ही एक साधना आहे, कला आहे. जेवण बनविताना माणसाने जर ते तल्लीनतेने बनविले तर ते अधिक रूचकर होते. काही वेळा तर काही माणसाच्या हाताची चव आपण चांगली आहे असेही म्हणतो. पाक कलेत निपूण होणे हे खरोखरच येऱ्या गबाळ्याचे काम नाहीय.. काही सेलिब्रिटी देखील या कलेत आपला हात आजमावून पाहतात. आता बिल गेट्स (Bill Gates) यांचे देखील नाव किचनमध्ये जेवण बनविणाऱ्या असामींमध्ये सामील झाले आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीत सामील असलेले बिल गेट्स यांनी किचनमध्ये आपला हात आजमावला ही काही फार मोठी गोष्ट नाही. परंतू त्यांनी कोणती डीश बनविली ही बातमी आहे. त्यांनी काय बनवले तर बिहारी रोठी बनवली. महाष्ट्रात जिला आपण चपाती किंवा पोळी देखील म्हणतो. अमेरीकन सेलिब्रेटी शेफ इटन बर्नेथ (Eitan Bernath) बर्नेथ मागे काही दिवसांपूर्वी भारतात आले होते. त्यांनी खूप ठीकाणी फिरत भारतातील खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेतला. ते बिहारच्या एका गावात गव्हाच्या शेतातील काम करणाऱ्या शेतकऱ्यांची आस्थेवाइकपणे चौकशी केली, येथे बर्नेथ यांनी सेल्फी देखील घेतले. त्यानंतर त्यांनी काही महिलांकडून इंडीयन ब्रेड ज्याला म्हणतात ती रोठी बनविण्याची पद्धत पाहून त्याची रेसिपी विचारली. तसेच त्या महिलांना रोठी बनविण्यास शिकवायला सांगितले.

इटन बर्नेथ जेव्हा भारत दौरा संपल्यावर आपल्या मायदेशी अमेरीकेत गेले. तेव्हा काही दिवसांनी त्यांची उद्योजक बिल गेट्स यांच्याशी भेट झाली तेव्हा गप्पा मारता मारता अचानक भारत भेटीचा विषय निघाला. बर्नेथ यांनी भारतात खूप मजा केली, खूप नविन गोष्ठी शिकल्याच्या आठवणी त्यांना सांगितल्या, तेव्हा बिल गेट्स यांनाही त्यांच्या भारत दौऱ्यांच्या आठवणी सांगितल्या. त्यावेळी बिहारला भेट दिल्याचे बर्नेथ यांनी त्यांना सांगितले. तसेच रोठी बनवायला आपण शिकलो असल्याचे शेफ बर्नेथ यांनी गेट्स यांना सांगताच तेव्हा अचानक त्यांचे भारत प्रेम उसळून आले.

बिल गेट्स यांनी शेफ बर्नेथ यांना रोठी बनवायला शिकवण्याची विनंती केली. त्यावर तातडीने दोघांनी रोठी बनविण्याचा प्लान केला. त्यानंतर तवा, पोलपाट, लाटणे याची शोधाशोध सुरू झाली. त्यांनी कणिक मळले. आणि बिल गेट्स यांना पिठ कसे मळतात हे देखील शिकवले. दोघांनी खूप मेहनत घेत अखेर कशीबशी पोळी लाटली. ही पोळी तव्यावर शेकायला सुरूवात केली. इतक्यात बिल गेट्स ब्रश घेऊन आले. आणि तव्यावरील पोळीला चांगले तूप चोपडले. आणि ही चपाती खरपूस भाजल्यावर गरमागरम डीश तयार झाली. या पोळीला त्यांनी भाजी आणि चटणी सोबत फस्त केले. ही पोळी खाता खाता शेफ बर्नेथ यांनी बिल गेट्स यांना विचारले कशी झालीय ? बिल गेट्स पटकन् म्हणाले काय जबरदस्त आहे ही रोठी !

देशमुख हत्या प्रकरणात टोकाचा संघर्ष; आज एकत्र दिसणार मुंडे आणि धस
देशमुख हत्या प्रकरणात टोकाचा संघर्ष; आज एकत्र दिसणार मुंडे आणि धस.
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.