Video | बसला तुफान गर्दी, मुलगी चालत्या बसमध्ये चढली खिडकीतून, प्रवाशांना बसला धक्का
Viral Video | एक मुलगी चालत्या बसमध्ये खिडकीतून प्रवेश करीत आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. अनेकांना हा व्हिडीओ पाहून धक्का बसला आहे. अनेकांनी हे सगळं कशासाठी असा प्रश्न विचारला आहे.
मुंबई : देशात बसमध्ये (BUS) धक्का लागणं, गर्दी असणं हे इथल्या लोकांसाठी नॉर्मल गोष्ट आहे. भारतात कधी कधी बसची वाट पाहत असताना कित्येक तास निघून जातात, हे कधीचं समजतं नाही. कधी-कधी गर्दीत चढताना आपल्याला अपयश येतं. बस उशिरा आल्यानंतर त्यामध्ये अधिक गर्दी असते. त्यामध्ये काही लोकं लटकून प्रवास करतात किंवा काही लोकं बसमध्ये उभं राहून जाणं पसंत करतात. सध्या एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. एक मुलगी (Ladki Ka Video) बसमध्ये चढण्यासाठी कशाप्रकारे जुगाड (JUGAAD) करीत आहे, हे व्हिडीओच्या माध्यमातून व्हायरल झालं आहे.
व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती शेअर
व्हिडीओमध्ये तुम्ही दिसत असेल की, एक बस लोकांनी खचाखच भरली आहे. बसमध्ये जाण्यासाठी इतकी गर्दी आहे की, त्या मुलीने खिडकीतून आतमध्ये जाण्याचा मार्ग निवडला आहे. ज्यावेळी ती मुलगी बसच्या खिडकीतून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करीत त्यावेळी तिथं असलेले प्रवासी एकदम शॉक झाले आहेत. एका प्रवाशाने त्या मुलीचा व्हिडीओ शूट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती शेअर झाला आहे.
View this post on Instagram
लोकांच्या मजेशीर प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडीओ ‘जुगाड व्हिडीओ’ (Funny Jugaad Video) इंस्टाग्रामवरती मीम पेजवरुन व्हायरल करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करीत असताना कॅप्शन लिहीलं आहे. कमाल की कलाबाजी, दुसऱ्या एका व्यक्तीने लिहीलं आहे की, मुलगी अधिक धाडसी आहे. ती अजिबात घाबरत नाही. तिने चालू बसमध्ये जाण्यासाठी खिडकीचा पर्याय निवडला आहे. एकजण म्हणतो की, त्या मुलीकडून थोडीशी जरी चूक झाली असती, तरी तिला हे सगळं प्रकरण महागात पडले असते.
सोशल मीडियावर असे व्हिडीओ अनेकांना आवडतात. त्याचबरोबर असे हटके व्हिडीओ अधिक व्हायरल होतात.