VIDEO | खोडकर माकडाने चिमुरडीचे केस ओढण्यास सुरुवात केली, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…
Viral Video | सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये चिमुकलीचे केस ओढताना माकड दिसत आहे. हा सगळा प्रकार पाहून नेटकरी पाहा काय म्हणत आहेत.
मुंबई : माकड हा प्राणी किती खोडकर (Viral Monkey Video) आहे, हे आपण अनेकदा पाहिलं आहे. कधी माकडं रस्त्यावर मस्ती करताना पाहिलं आहे, तर कधी माकडं जंगलात इतर प्राण्यांना त्रास देताना पाहिलं आहे. सद्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ते माकडं (Monkey) एका सायकलमध्ये बसलेल्या चिमुकलीला कशा पुद्धतीने त्रास देत आहे, हे पाहावयास मिळत आहे. माकडाला एखाद्याने मुद्दाम त्रास दिला, तर त्याचा ते कशा पद्धतीने बदला घेतात हे एका व्हि़डीओच्या माध्यमातून उघडकीस आलं आहे. आई आपल्या चिमुकलीला रस्त्यातून घेऊन निघाली आहे. त्याचवेळी तिथं असलेल्या माकडाला काय तरी बोलते, त्यानंतर ते माकडं चिमुकलीचं केसं ओढण्यास सुरुवात करते. हा सगळा प्रकार तिथं असलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये (Viral Video) कैद केला आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केली आहे.माकडं हा प्राणी असा आहे की, तो प्रत्येकवेळी मस्ती करीत असताना पाहायला मिळतो. कधी एखाद्याचा चेष्मा घेऊन पळून जातात, तरी कधी कुणाच्या हातातली खायची वस्तू घेऊन पळून जातात. सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्या माकडाचं कृत्य पाहून अनेकांना वाईट वाटलं आहे. त्या व्हिडीओमध्ये काही महिला आपल्या चिमुकल्यांना छोट्या सायकलमध्ये बसवून तिथून घेऊन जात आहेत. तिथून एक लाल सायकल जात आहे, त्याचवेळी त्यामध्ये कायतरी खायला मिळेल. या हेतूने ते माकडं एकदम जवळ येते. त्याचवेळी ते माकडं आतमध्ये हात घालून काय आहे का पाहत आहे. त्याचवेळी ती चिमुकलीची आई तिथून त्याला हटकण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर काय झालंय ते तुम्ही व्हिडीओत पाहा.
Poor Baby
naughty #Monkey#viralvideo #TrendingNow #animals pic.twitter.com/HejgpnFhdL
— SuVidha (@IamSuVidha) April 22, 2023
व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की, ती महिला ज्या पद्धतीने रागाने त्या माकडाला तिथून हाकलत आहे. त्यानंतर माकडाला प्रचंड राग येतो. राग आल्यानंतर त्या सायकलमध्ये बसलेल्या चिमुकलीची केसं तो खेचायला सुरुवात करतो. त्यानंतर लगेच ती महिला त्या माकडाला आणि चिमुकलीचा वेगळं करते. त्या व्हिडीओमध्ये ती चिमुकली घाबरल्यामुळे जोरात ओरडत आहे. माकडाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.