या नदीतील नौका हवेत तरंगते की काय, कोणत्या देशातील ही आरस्पानी नदी आहे
एकीकडे आपण तथाकथित विकासाच्या हव्यापोटी झाडे तोडण्यापासून आणि काँक्रीटच्या इमारती उभ्या करीत आहोत. नदी, समुद्राचे पाणी घाणीने दूषित करीत आहोत, तर दुसरीकडे देशाच्या एका कोपऱ्यात निसर्ग अजूनही टीकून आहे. कुठे आहे ही इतकी नितळ नदी ?
शिलाँग : सततचे प्रदूषण आणि वाढत्या जागतिक तापमानवाढीमुळे एकीकडे चिंता व्यक्त केली जात आहे. तर काही ठिकाणं निसर्ग ( NATURE ) अजूनही शहरी प्रदुषणापासून मुक्त आहेत. कोरोनाच्या साथीत सर्व व्यवहार ठप्प झाले असताना ( POLLUTION ) प्रदुषणाची पातळी कमी झाल्याने अनेक पक्षी अचानक आपले अस्तित्व दाखवत होते. त्यात आता आपल्या देशातील ‘सेव्हन सिस्टर्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका राज्यातील एक नदी मात्र अजूनही सर्व प्रकारच्या प्रदुषणापासून कशी मुक्त आहे, हे या व्हायरल ( VIRAL ) व्हीडीओतून दिसत आहे.
मेघालयातील एका उमनगोत नावाच्या नदीवरील नौका सफरीचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. या नदीचे पाणी इतके स्वच्छ आहे की तिचा तळ आरपार दिसत आहे. या पाण्यातील नौकेतील महिलेचा हा फोटो पाहून तुम्हाला ही नौका हवेत उडत असल्याचा भास होईल इतके नितळ हे पाणी दिसत आहे. ‘गो अरूणाचल प्रदेश’ या ट्वीटर हॅंडलने हा फोटो शेअर केला असून त्यास खूप लाईक मिळत आहेत.
एकीकडे आपण तथाकथित विकासाच्या हव्यापोटी झाडे तोडण्यापासून आणि काँक्रीटच्या इमारती उभ्या करीत आहोत. नदी, समुद्राचे पाणी घाणीने दूषित करीत आहोत, दररोज आपण निसर्गाचा असा ऱ्हास करत आहोत. प्रदूषण इतके तीव्र झाले आहे की धुरात श्वास घेणे कठीण झाले असताना देशातील काही राज्यात अजूनही निसर्ग आपले खरे रूप दाखवत मनाला तृप्त करीत आहे.
पूर्वेचा स्कॉटलंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेघालयातील उमनगोत नदीला देशातील सर्वात स्वच्छ नदीचा बहुमान मिळाला आहे. तिचे पात्र इतके नितळ आहे की नौका जणू हवेवरच तरंगत असल्याचा भास होतो. शिलाँगपासून 85 किमी अंतरावर भारत-बांगलादेश सीमेजवळ पूर्व जयंतिया हिल्स जिल्ह्यातील दावकी गावातून ती वाहते. लोक तिला पर्वतराजीत लपलेला स्वर्ग मानतात. येथील स्वच्छतेस खासी आदिवासी समुदायातील पूर्वापार परंपरा कारणीभूत आहे. स्वच्छता त्यांच्या संस्कारातच आहे.
Have you ever seen this Flying boat in India?
Meghalaya ?https://t.co/yWHSGjHp2h pic.twitter.com/wYG9TWLpSm
— Go Arunachal Pradesh (@GoArunachal_) February 2, 2023
उमनगोत दावकी, दारंग व शेंगांडेंग या गावांतून वाहते. या गावातील लोकांवर नदीच्या स्वच्छतेची जबाबदारी आहे. गावात तीनशे घरे आहेत व सर्व लोक मिळून स्वच्छता करतात. येथे स्वच्छतेचे पालनही सक्तीने केले जाते. घाण केल्यास पाच हजार रुपयांपर्यंत दंड लावला जातो. नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंत सर्वात जास्त पर्यटक येथे भेट देण्यासाठी येत असतात. मान्सूनमध्ये येथील बोटिंग बंद असते. मेघालयातील उमंगोट नदी हे पर्यटकांचे लोकप्रिय ठिकाण आहे. निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी लोक येथे येतात, बंजी जंपिंग, कायाकिंग आणि बोटिंग येथे केले जाते. उमंगोट नदीच्या पलीकडे बांगलादेशची सीमा आहे. या नदीच्या व्हिडिओला 12 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत या व्हिडिओमुळे तुम्हालाही उमंगोट नदीलाही भेट द्यायची इच्छा होईल, होय की नाही !