असं म्हणतात, की जीवनात मित्र (Friends) असे बनवावे की ते तुम्हाला प्रत्येक क्षणी साथ देतात. मग तुम्ही सुखात असाल किंवा दुःखात. तरच मैत्रीची खरी ओळख कळू शकते. मैत्रीचं नातं रक्ताचं नसलं तरी रक्ताच्या नात्यापेक्षा कमी नसतं. ते लोक भाग्यवान असतात, ज्यांना खरे मित्र मिळतात, जे तुम्हाला सदैव साथ द्यायला तयार असतात. अशा लोकांनी अजिबात मित्र बनू नये, ज्यांना ना स्वतःच्या जिवाची पर्वा असते ना इतरांच्या जिवाची. असे मित्र तुम्हाला अडचणीत आणू शकतात आणि कधी कधी त्यांच्यामुळे तुमचा जीवही जाऊ शकतो. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बाइक राइड(Bike Ride)ला जात असाल, तर नेहमी लक्षात ठेवा, की कट मारून बाइक चालवणं टाळा, अन्यथा स्टंट (Stunt) दाखवणं जिवावर बेतू शकतं. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यातून प्रत्येकानं शिकण्याची गरज आहे.
…तर जीवही जाऊ शकतो
व्हिडिओमध्ये दोन मित्र स्कुटीनं कुठेतरी जात आहेत, मात्र चालवणार तरुण अत्यंत धोकादायक पद्धतीने बाइक चालवत आहे. ‘वेव्ह कट’ मारताना तो कधी इकडे तिकडे जातो. बाइकवरून पडल्यानंतर त्याचा जीवही जाऊ शकतो आणि तो मागे बसलेल्यासाठी जीवघेणा ठरू शकतो, याची त्याला अजिबात पर्वा नाही. शिवाय त्यानं हेल्मेटही घातलेलं नाही. अशा परिस्थितीत थोडीशी चूक त्यांचा जीव घेऊ शकते.
ट्विटर हँडलवर व्हिडिओ शेअर
आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलं, की ‘कोणते मित्र सोडून देणे चांगले आहे, ते जाणून घ्या फक्त 5 सेकंदात. अवघ्या काही सेकंदांचा हा व्हिडिओ आयुष्यातला सर्वात मोठा धडा देतो, की अशा मित्रांपासून दूर राहावं, ज्यांना कोणाच्याही जीवाची पर्वा नाही.
“किन मित्रों को त्यागना अच्छा होता है”
जानिए सिर्फ 5 सेकेंड में. pic.twitter.com/AMNN16GoZD— Dipanshu Kabra (@ipskabra) January 17, 2022
‘तो स्वतः मरेल आणि इतरांनाही मारेल!
हा व्हिडिओ आतापर्यंत 2 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइकदेखील केलं आहे. त्याचबरोबर काहींनी कमेंट करून आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरनं लिहिलंय, की ‘तो स्वतः मरेल आणि इतरांनाही मारेल!’, तर दुसऱ्या यूझरनं ‘अशा लोकांचे लायसन्स रद्द केले पाहिजे… तरच इतरांचे जीवन सुरक्षित राहील’, असं लिहिलं आहे.