VIDEO | हा मुलगा स्वत:ची मान विरुध्द बाजूला फिरवतो, पाहणाऱ्यांना फुटला घाम, लोक म्हणतात…
आतापर्यंत हा व्हिडीओ 12 लाख लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर लाखो लोकांनी त्या व्हिडीओला लाईक सुध्दा केले आहे. व्हिडीओ ज्याने व्हायरल केला आहे. त्याच्या अकाऊंटवरती 24 हजार पेक्षा अधिक लोकं आहेत.
मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) आतापर्यंत अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाले आहेत. त्यातले चांगले आणि वाईट कोणते हे सुध्दा लोकांनी ठरविले आहे. सोशल मीडियावर विविध माध्यमातून व्हिडीओ व्हायरल होत राहतात. काही स्वत:च्या प्रसिध्दीसाठी व्हिडीओ (Shocking video) तयार करीत असतात. तर काहीजन अधिक प्रसिध्द होण्यासाठी चुकीची भाषा वापरतात, काहीजण चुकीचं कृत्य व्हिडीओत करतात, मग प्रसिध्दीच्या झोतात आल्यानंतर माफी मागतात. अशाच एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
नेमकं व्हिडीओत काय आहे
एका तरुणाने पायऱ्या चढत असताना स्वत:ची मान उलटी फिरवल्यामुळे पाहणाऱ्या लोकांना घाम फुटला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. काही नेटकऱ्यांनी त्याला “तु फक्त रात्रीचं काम करं असा सल्ला दिला आहे. नाहीतर लोक तुला भूत समजतील.” त्या तरुणाचं शरीर इतकं लवचीक आहे की, त्याने हिशोबाच्या बाहेर त्याची मान वळवली आहे. विशेष म्हणजे अशी मान वळवणं कोणत्याही सामान्य माणसाला शक्य नाही.
View this post on Instagram
या व्हिडीओला इंस्टाग्रामवरती @prem_bone_brothers या वापरकत्याने शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 12 लाख लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर लाखो लोकांनी त्या व्हिडीओला लाईक सुध्दा केले आहे. व्हिडीओ ज्याने व्हायरल केला आहे. त्याच्या अकाऊंटवरती 24 हजार पेक्षा अधिक लोकं आहेत.