Video | डोंगराळ भागात उंचावर जात असताना बाईक घसरली, गोलांटी उडी घेत बाईक दरीत…
Viral Video | सोशल मीडियावर एका बाईकच्या अपघाताचा व्हिडीओ शेअर झाला आहे. ज्यावेळी ती बाईक डोंगराळ भागातूनवरती जाण्याचा प्रयत्न करीत आहे, त्याचवेळी हा अपघात झाला आहे.
मुंबई : कधी आपण एखाद्या व्हिडीओमध्ये (viral video) राईडर (Rider) लोकांना डोंगराळ भागात बाईक चालवत असल्याचे पाहतो. काही राइडर्स आठवड्याला जवळच्या डोंगराळ भागात जाऊन बाईक चालवण्याची मजा घेतात. राइडर लोकांचा ग्रुप असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. त्या अपघाताचे सुध्दा अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media platform) व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. लडाखच्या डोंगराळ भागात जाणं म्हणजे अनेकांसाठी एक मोठं स्वप्न आहे. काहीवेळेला मोठ्या डोंगराळ भागात जाताना राईडर्स लोकांचे अपघात सुध्दा झाले आहेत. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळतात. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये डोंगराळ भागात बाईक घसरली आहे.
सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक बाईक राईडर आपली बाईक डोंगराळ भागात उंचावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचवेळी तिथं असलेल्या दरीत त्याची बाईक घसरते. राईडरच्या मागे जी व्यक्ती आहे. त्याने हा सगळा अपघात आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.
हा व्हिडीओ ट्विटरवरती @1000waystod1e नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये, एक राइडर एका टेकडीच्या माथ्यावर असलेल्या खडकाळ अरुंद वाटेने त्याच्या दुचाकीला जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तो तिथून गाडी काढण्याचा प्रयत्न करीत आहे. तिथं एक दगड आहे. तिथून तो वाट काढण्याचा प्रयत्न करीत आहे, त्याचवेळी त्याची बाईक एका बाजूला झुकलेली पाहायला मिळते.
— 1000 WAYS TO DIE (@1000waystod1e) April 28, 2023
व्हिडीओ पाहून अनेकांना बसला धक्का
हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांना धक्का बसला आहे, बाईक डोंगरावरुन खाली जाताना व्हिडीओत पाहणाऱ्या लोकांना मोठा धक्का बसला आहे. त्याचवेळी राईडर आपला जीव वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 1.4 मिलियन लोकांनी पाहिला आहे. १३ हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक सुध्दा केले आहे.