खाणीत सापडला 378 कॅरेटचा लखलखीत हिरा, किंमत वाचून डोळेही लखलखतील
378 कॅरेटचा हा शानदार हिरा या वर्षातील 300 कॅरेटहून अधिक प्रकारातील दुसरा हिरा आहे (white diamond 378 carat Botswana )
गॅबरोने (बोट्सवाना) : दक्षिण आफ्रिकन देश बोट्सवानातील (Botswana) खाणीमध्ये 378 कॅरेटचा पांढरा हिरा सापडला आहे. या हिऱ्याची किंमत 110 कोटी रुपयांच्या घरात आहे. कॅनडियन संशोधकांनी हा हिरा खाणीतून शोधून काढला. हा सर्वोच्च गुणवत्ता असलेला हिरा मानला जातो. (white diamond 378 carat found in south Africa Botswana estimated to be worth 110 crore rupees)
378 कॅरेटचा हा शानदार हिरा या वर्षातील 300 कॅरेटहून अधिक प्रकारातील दुसरा हिरा आहे. ल्युसारा कंपनीचे सीईओ ईरा थॉमस यांनी मंगळवारी याबाबत अधिकृत निवेदन जारी केलं. अशा प्रकारचा शानदार हिरा सापडणं, ही 2021 ची मजबूत सुरुवात होण्याचे संकेत आहेत, असंही थॉमस यावेळी म्हणाले.
कारोवमध्ये वित्त निर्मितीच्या संधी
बोट्सवानातील कारोव खाणीत उच्च गुणवत्तेच्या हिऱ्याची क्षमता अधिक उजळून निघाल्याचं म्हटलं जात आहे. “378 कॅरेट किंवा 341 कॅरेटसारख्या मोठ्या हिऱ्यांमुळे कारोवमध्ये भूमिगत संपत्ती आणि वित्त निर्मितीच्या संधी असल्याचं अधोरेखित होतं” असं थॉमस यांनी सांगितलं.
200 कॅरेटपेक्षा अधिक मजबुतीचा 55 वा हिरा
2026 पर्यंत कारोवमधील खनिज क्षेत्राची अधिक माहिती मिळवून किमान 13 वर्षांपर्यंत उत्खननाचं काम केलं जाईल. कारोवच्या खाणीतून बाहेर काढलेला हा हिरा 2015 मध्ये सापडलेल्या 200 कॅरेटच्या हिऱ्यापेक्षा अधिक मजबुतीचा 55 वा हिरा आहे.
कॅरेट म्हणजे काय?
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हिऱ्याची मागणी कायमच अधिक असते. हिऱ्याचे कॅरेट अधिक, तशी त्याची किंमतही अधिक असते. कॅरेट हे महागडे धातू आणि हिऱ्याच्या शुद्धतेच्या मापनाचे परिणाम आहे. (white diamond 378 carat found in south Africa Botswana estimated to be worth 110 crore rupees)
पाकिस्तानला सोन्याचा मोह महागात
पाकिस्तानने खाणीच्या उत्खननासाठी ज्या कंपन्यांशी करार केला होता, ते करार लोभापाई त्यांनी पुढे रद्द केले. पाकिस्तानला त्यांच्या या चुकीचं फळ भोगावं लागणार आहे. कारण वेस्ट इंडिजच्या एका कोर्टाने पाकिस्तान विरोधात मोठा निर्णय जाहीर केला आहे. आर्थिक संकटात होरपळणाऱ्या पाकिस्तानाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. वेस्ट इंडिजच्या British Virgin Islands च्या एका कोर्टाने पाकिस्तान सरकारला तब्बल 6 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 44 हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
बलुचिस्तानात जगातील सर्वात मोठी पाचवी सोन्याची खाण
पाकिस्तानच्या बलुचिस्तानातील रेको डिक ही खाण जगातील पाचवी सर्वात मोठी सोने आणि तांब्याची खाण आहे. सोन्याची खाण अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमेजवळ आहे. या खाणीतून दरवर्षी दोन लाख टन कॉपर आणि अडीच लाख औंस सोनं काढलं जातं. या खाणीतून पाकिस्तानला दरवर्षी 3.64 अब्ज डॉलरचा फायदा होतो. विशेष म्हणजे पुढच्या 55 वर्षांपर्यंत या खाणीतून सोनं आणि तांबे काढले जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
एका रात्रीत शेतकरी झाला मलामाल, शेतात काहीतरी चमकताना दिसलं आणि…!
(white diamond 378 carat found in south Africa Botswana estimated to be worth 110 crore rupees)