कुठल्याही दुसऱ्या देशात जायचं म्हटलं की आधी तो पासपोर्ट आहे का बघा. नसेल तर तो बनवा. त्यासाठी हजारदा हेलपाटे घाला. किती ती कटकट असते ना? पासपोर्ट ही गोष्ट फिरण्यासाठी फारच महत्त्वाची बुआ! त्या पासपोर्ट मध्ये आपण कोण आहोत, कुठचे आहोत, आपलं नाव काय, आपण कसे दिसतो हे दाखविणाऱ्या सगळ्या गोष्टी असतात. ते एक अधिकृत प्रमाणपत्र असतं ज्याच्या मदतीने आपण एकदम सुरक्षित पद्धतीने जगात कुठेही जाऊ शकतो. सगळ्यांनाच हा पासपोर्टचा नियम लागू होतो. कुणीही असो पासपोर्ट हवाच! पण जगात अशी ३ लोकं आहेत. जे पासपोर्ट शिवाय जगभर फिरू शकतात. ज्यांना पासपोर्टची गरज नाही. फक्त 3!
अर्थातच तुम्हाला ती 3 लोकं कोण याबाबत कल्पना नसेलच म्हणून तुम्ही ही बातमी वाचताय. पण त्या 3 लोकांमध्ये ना आपले पंतप्रधान आहेत आणि ना आपले राष्ट्रपती. ही तीन लोकं कोण?
आश्चर्य वाटेल कारण अशी जगात फक्तच 3 लोकं आहेत. जगात! ब्रिटनचा राजा, जपानची राणी आणि जपानचा राजा! बास्स. तुम्हालाही वाटत असेल ना की आपले पंतप्रधान आणि राष्ट्रपती तरी त्यात असावेत? पण या तीन लोकांशिवाय इतर कुणालाही ही सूट नाही.
चार्ल्स तिसरा या महिन्यात ब्रिटनचा राजा झाला. आई आणि राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ते हे पद सांभाळत आहेत.
महाराज होताच ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांना पूर्ण आदराने कुठेही जाण्या-येण्याची मुभा देण्यात यावी आणि त्यांच्या प्रोटोकॉलचीही काळजी घेतली जावी, असे ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सर्व देशांना कळविले.
राजा चार्ल्सच्या आधी त्याची आई राणी एलिझाबेथ दुसरी हिला पासपोर्टशिवाय कुठेही जाण्याचा अधिकार होता. सिंहासनावर बसलेल्या राजा किंवा राणीलाच पासपोर्टशिवाय कुठेही जाण्याचा अधिकार आहे. राजा चार्ल्स तिसरा यांच्या पत्नीला ही मुभा नाही. त्यांना डिप्लोमॅटिक पासपोर्टची गरज लागते.
सध्या जपानचा राजा नारूहितो असून त्याची पत्नी मसाको ओवादा ही जपानची राणी आहे. इथे पासपोर्टशिवाय परदेशात जाण्याची पद्धत 1971 मध्ये सुरू झाली.
जपानचे राजा आणि राणी जर कुठल्या देशात जाणार असतील तर त्यांच्यामार्फत एक अधिरकृत पत्र त्या देशाला पाठवलं जातं. या पत्राचा वापर पासपोर्ट म्हणून केला जातो. पण पासपोर्ट ची गरज जपानच्या राजा राणीला तरी नसते.