उर्फी जावेदशी तुलना होणारी, मेट्रोत बिकीनी घालून फिरणारी ती मुलगी नेमकी आहे तरी कोण ?

Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रोत बिकीनी घालून प्रवास केल्यामुळे एक मुलगी सध्या खूप चर्चेत आली असून अनेक लोक तिच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. बोल्ड ड्रेस घालून मेट्रोमध्ये येणारी ही मुलगी कोण?

उर्फी जावेदशी तुलना होणारी, मेट्रोत बिकीनी घालून फिरणारी ती मुलगी नेमकी आहे तरी कोण ?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Apr 05, 2023 | 3:31 PM

नवी दिल्ली : सोशल मीडियावर (social media)  सक्रिय असलेल्या लोकांनी आत्तापर्यंत दिल्ली मेट्रोमध्ये बिकिनी (Delhi Metro Bikini Girl)घालून प्रवास करणाऱ्या मुलीचा व्हिडिओ पाहिला असेल. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. व्हिडिओवरून सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अनेक लोक या मुलीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत तर काहीजण तिच्या ड्रेसिंग सेन्सची तुलना सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदशी करत आहेत. उर्फीच्या ड्रेसची सोशल मीडियावरही खूप चर्चा होते. पण बोल्ड ड्रेस घालून मेट्रोमध्ये प्रवास करणारी ही मुलगी नेमकी आहे तरी कोण? आम्ही तुम्हाला सांगतो.

दिल्ली मेट्रोमध्ये बिकिनी परिधान केलेल्या या तरुणीचे नाव रिदम चनाना आहे. मला हवे ते कपडे परिधान करण्याचे स्वातंत्र्य मला आहे, असे ती म्हणते. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिहिले की, लोक तिला मेसेज करून विचारत आहेत की तूच ती मेट्रोतली मुलगी आहेस का ? मेट्रोची मुलगी आहेस. त्यांना प्रत्युत्तर देताना रिदमने आपणच ती मुलगी असल्याचे सांगितले. चनना म्हणाली की हो मी ती मुलगी आहे.

काय म्हणाली रिदम ?

एका मुलाखतीत रिदमने सांगितले की, ‘मी हे प्रसिद्ध होण्यासाठी किंवा पब्लिसिटी स्टंटसाठी केलेले नाही. लोक काय म्हणतात याची मला पर्वा नाही’. उर्फी जावेदपासून प्रेरणा घेऊन तिने हे पाऊल उचलले आहे का, असा प्रश्नही काही लोक तिला विचारत आहेत. यावर रिदम म्हणाली की मी तिला ओळखत नाही आणि तिच्यापासून काही प्रेरणाही घेतलेली नाही. काही दिवसांपूर्वी एका मित्राने मला तिचा फोटो दाखवला होता.

हा निर्णय एका दिवसात होत नाही. ती एक संपूर्ण प्रक्रिया आहे. माझे कुटुंब ऑर्थोडॉक्स आहे. मला तिथे हे सर्व करण्याचे स्वातंत्र्य नाही. एके दिवशी मी ठरवले की मला वाटेल तसंच वागेन. गेल्या अनेक महिन्यांपासून मी असाच प्रवास करत आहे. माझ्या कुटुंबातील सदस्यही या प्रकाराने खूश नसल्याचेही तिने सांगितले. शेजारीही तिला धमक्या देत आहेत. पण तिला त्यांची पर्वा नाही.

दिल्ली मेट्रोचं काय आहे म्हणणं ?

या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे वक्तव्यही आले आहे. डीएमआरसीने सांगितले की सर्व प्रवाशांनी नियम आणि शिष्टाचारांचे पालन करणे अपेक्षित आहे. प्रवाशांनी असे कपडे घालू नयेत किंवा इतर प्रवाशांच्या संवेदनशीलतेचा अपमान होईल अशा कोणत्याही कृतीत सहभागी होऊ नये. DMRC च्या ऑपरेशन्स अँड मेंटेनन्स कायद्याच्या कलम 59 अंतर्गत अश्लीलता हा दंडनीय गुन्हा आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.