10 टक्के लोकं डावखुरे (Left Handers) असतील, तर एक गोष्ट वेगळी सांगायला नको. ती म्हणजे 90 टक्के लोकं आपल्या उजव्या हाताचा (Right Handers) वापर करणारी आहे. ही आकडेवारी जगभरातली असून यात उजवं आणि डावं करण्यासारखं काही नाही! मुळात डावखुरं होणं किंवा न होणं, हे कुणाच्या हातात आहे, हे कळलं तर अर्धा वाद मिटेल. त्यामुळे डाव्या-उजव्याचं मूळ नेमकं काय, यावरचा अभ्यास नेमका काय सांगतो, हे समजून घेण्याचा प्रयत्न करुयात. काही जणांना वाटतं की आई-वडील उजवे आहेत, म्हणून त्यांची मुलंही उजव्या हातानं लिहितात किंवा डावखुरे होत नाही! पण खरंच असं आहे का? डीएनएचा (DNA) आणि डावखुरे होण्या न होण्याचा एकमेकांशी काही संबंध आहे का?
सुरुवातीपासून सुरुवात करुयात! डावं उजवं असण्याचा थेट संबंध आहे मेंदूशी. मेंदू डाव्या बाजूने उजव्या बाजूला ऑर्डर सोडतो. त्यामुळे डाव्या बाजूचा मेंदू उजव्या बाजूच्या हाताला लिहिण्याचं फर्मान देतो. डावखुऱ्यांमध्येही असंच असतं. त्यांचा उजव्या बाजूचा मेंदू डाव्याला ऑर्डर सोडतो. तुम्ही म्हणात यात काय वेगळंय! हे तर आम्हालाही माहीत आहे. तर मंडळी यात वेगळी गोष्ट आहे, ती म्हणजे वेळ, ऊर्जा आणि मॅनेजमेन्ट प्रोसेसची.
आपल्या मेंदूतून ऑर्डर निघण्याआधी या सगळ्या प्रक्रिया होत असतात. त्यातून उजव्या हाताला काम करायला सांगायचं की डाव्या, हे ठरतं! त्याप्रमाणं आपलं शरीर काम करु लागतं. डावं-उजवं होणं, हे या प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे. या प्रक्रियेला टाळून डावं-उजवं करता येत नाही.
तुम्ही डावे असाल, आणि उजव्या हातानं काही गोष्टी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलात, तर तुमच्याही एक गोष्ट ध्यानात येईल. जितक्या सहजपणे तुम्ही डाव्या हातानं गोष्टी करु शकत आहात, तितक्या सहजपणे तुम्हाला त्याच गोष्टी उजव्या हातानं करता येत नाहीत. ही गोष्ट उजव्या हातानं सर्रास वापर करणाऱ्यांमध्येही पाहायला मिळू शकेल.
यात काही इंटरेस्टिंग बाबीही असतात. म्हणजे डावखुरा माणूस सगळ्याच गोष्टी डाव्या हातानं करेल असंही नाही. सौरव गांगुलीचं उदाहरण घ्या. तो बॅटिंग डाव्या हातानं जरी करत असला, तरी बॉलिंग मात्र उजव्या हातानं करायचा. ही वर सांगितलेल्या प्रक्रियेची किमया आहे. वेळ, ऊर्जा आणि मॅनजमेन्टचा हिशोब करुन मेंदू योग्य हाताला निवडतो आणि काम करण्यास भाग पाडतो!
आता मुद्दा येतो, तो आई-वडील डावे आहेत म्हणून मुलंही डावखुरी असण्याचा! तर मंडळी हे पूर्णपणे खरं नसलं, तरी पूर्णपणे ही गोष्ट नाकारताही येणार नाही. काही प्रमाणात ही गोष्ट घडते. त्याची आकडेवारीही अभ्यासातून समोर आली आहे. जर पालक उजव्या हाताचे असतील तर त्यांची मुलं ही डावखुरी असण्याची शक्यता फक्त 9 टक्के असल्याचं 2012 साली करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आलं आहे. तर दुसरीकडे जर आई-वडीलांपैकी एक जण डावा आणि एक जण उजवा असेल, तर मूल डावखुरं होण्याची शक्यता 10 ते 19 टक्के इतकी असते. शिवाय जर आई-वडील दोघंही डावखुरे असतील तर मात्र ही शक्यता आणखी वाढते. इतकी की तब्बल 100 मधील 26 जणांची मुलं ही आई-वडील दोघंही डावखुरी असल्यानं डावखुरीच बनतील.
बहुतांश प्रमाणात जगातली लोकसंख्या ही उजव्या हाताचा वापर सर्रास करते. लिहिण्यासाठी, खाण्यापिण्यासाठी, मोबाईल वापरण्यासाठी, इतर अनेक दैनंदिन गोष्टींबाबतही उजवा हात हा डाव्या हाताच्या तुलनेत जास्त वापरला जात असल्याचं आढळून आलंय. त्यामुळे उजवा हात वापरणाऱ्यांची संख्या ही डावा हात वापरणाऱ्यांच्या तुलनेत अगदीच कमी आहे. फक्त 10 टक्के लोक हे त्यामुळेच उजव्या हाताचा वापर करणारे नसून डावखुरे आहेत. त्यामुळेच तर ते इतरांपेक्षा खास आहेत!
तुम्ही कधी स्टीम बाथ घेतला आहे का? मग घेण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या स्टीम बाथचे फायदे
Yoga Poses : पाठदुखीचा त्रास दूर करण्यासाठी ‘ही’ 5 योगासने फायदेशीर!
तिशितलं वृद्धत्व: उच्च रक्तदाब ते केसगळती; ‘या’ गोष्टी तुम्ही समजून घ्यायलाच हव्यात!
Perfect Bra Tips: प्रत्येक मुलीला माहिती पाहिजे ब्रा बद्दलचे ‘हे’ नियम! जाणून घेऊयात बेसिक माहिती