नीता अंबानी त्यांच्या मुलांच्या हाताला काळा धागा का बांधतात? जाणून घ्या
आजकाल अनेक लोक त्यांच्या हातांमध्ये किंवा पायांमध्ये काळा धागा बांधतात, यातच संपुर्ण अंबानी कुटुंब देखील या काळ्या धाग्याला त्यांच्या हातात बांधताना दिसतात. पण प्रश्न असा आहे की, त्यामागे कारण काय आहे? या परंपरेच्या मागे एक खास विश्वास दडलेला आहे. चला जाणुन घेऊ

अंबानी परिवाराचे नाव घेताच डोळ्यांसमोर एक भव्य आणि आलिशान जीवनशैलीचे चित्र उभे राहते. नुकताच पार पडलेला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा भव्य विवाह सोहळा सोशल मीडियावर ट्रेंड करत होता. या सोहळ्या दरम्यान एक गोष्ट सर्वांच्या नजरेत आली, ती म्हणजे अंबानी कुटुंबातील प्रत्येक सदस्य यांच्याहातात बांधलेला काळा धागा. अखेर काळा धागा काय आहे, आणि अंबानी कुटुंबातील प्रत्येक सदस्य याला का हातात बांधतो? चला तर मग, जाणून घेऊया या परंपरेचे रहस्य.
काळा धागा बांधण्याची परंपरा भारतात खूप जुनी आहे. याला प्रामुख्याने वाईट नजरेपासून वाचण्याकरिता वापरले जाते. भारतीय संस्कृतीत असा विश्वास आहे की काळा धागा नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करतो आणि व्यक्तीला शांती आणि समृद्धी प्राप्त होण्यास मदत करतो. काही लोकांच्या मते, काळा धागा बांधल्यामुळे शनिदोष दूर होतो आणि व्यक्तीच्या यशाच्या मार्गातील अडचणी देखील कमी होतात.
अंबानी कुटुंबात ही परंपरा का आहे?
अंबानी कुटुंब, ज्याचे आलिशान जीवन आणि मोठे कार्यक्षेत्र सतत चर्चेचा विषय असतो, त्यांच्या प्रत्येक छोट्या सवयीमध्ये एक दीर्घकालीन परंपरा आणि विश्वास दिसून येतो. काळा धागा बांधण्याची परंपराही त्यांच्या कुटुंबासाठी खास आहे. उदाहरणार्थ, नीता अंबानी, जेव्हा एखाद्या इव्हेंटमध्ये किंवा कार्यक्रमात सहभागी होतात, तेव्हा त्या त्यांच्या हातात काळा धागा बांधतात. त्याचप्रमाणे, त्यांची मुलं, सुना आणि इतर सदस्य त्यांच्या प्रत्येक समारंभात काळा धागा बांधूनच सहभागी होतात.




अंबानी कुटुंबाचे कपडे आणि दागिने दर वेळेस नवीन आणि भव्य असतात. मात्र, एक गोष्ट कायम राहते, आणि ती म्हणजे हा काळा धागा. ते ट्रेडिशनल कपडे घालोत किंवा वेस्टर्न, काळा धागा त्यांच्याहातात सदैव दिसतो. काळा धागा हा फक्त एक फॅशन स्टेटमेंट नाही, तर तो त्यांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा राखतो.
का महत्त्वाचा आहे हा काळा धागा?
हा काळा धागा अंबानी कुटुंबासाठी विश्वासाचे प्रतीक आहे. प्रत्येक सदस्य याला आपल्या जीवनात समृद्धी, यश आणि शांतीच्या कामना करून बांधतो. जेव्हा नीता अंबानी किंवा मुकेश अंबानी मोठ्या इव्हेंटमध्ये सामील होतात, तेव्हा हा काळा धागा त्यांच्या हातात नक्कीच दिसतो. याच्या माध्यमातून ते आपल्या कुटुंबाच्या जीवनात सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न करतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही