पंडितजी एवढे का रागावले? वधू – वराची सप्तपदी सुरू असताना हातातील पुजेच ताट थेट फेकून मारलं, Video viral
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे विवाहासंबंधित अनेक गमतीशीर व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे विवाहासंबंधित अनेक गमतीशीर व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. काही व्हिडीओमध्ये वर हटके अंदाजात विवाह मंडपात एण्ट्री घेतो तर काही व्हिडीओमध्ये वधू आपल्या धमाकेदार डान्सने नेटकऱ्यांचं मन जिंकून घेते. मात्र सध्या एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतं आहे. हा व्हिडीओ वधू- वराचा नसून लग्न लावणाऱ्या पंडितजींचा आहे. वधू वरांची सप्तपदी चालू असताना पंडितजींना एवढा राग येतो की ते त्यांच्या हातातील पुजेचं ताट वधू -वराच्या मित्रांना फेकून मारतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, पंडितजींच्या रागाचा वधू वरांच्या मित्रांनी चांगलाच धसका घेतला.मात्र या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना अनेकांनी असं म्हटलं आहे की, पंडितजींनी जे केलं ते अगदी योग्य केलं.
विशेष म्हणजे ही घटना जेव्हा वधू- वराची सप्तपदी सुरू होती तेव्हा घडली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. वधू -वर अग्नीला साक्षी ठेवून सप्तपदीचे फेरे घेत आहेत. त्यांच्या जवळ काही नातेवाईक उभे आहेत. वधू-वराचे मित्र मैत्रिणी देखील तिथे उपस्थित होते, मात्र ते आपल्या हातातील फुलं ज्यापद्धतीनं वधू- वरावर फेकत आहेत ते पाहून पंडितजींना चांगलाच राग आला आणि त्यांनी आपल्या हातातील ताट मित्रांच्या दिशेनं फेकून मारलं.
पंडितजींना एवढा राग आला की त्यांनी आपल्या हातातील ताट थेट वधू -वराच्या मित्रांच्या दिशेनं फेकून मारलं. पंडितजींचा राग पाहून वधू वरांना देखील काही काळ चांगलाच धक्का बसला. ताट फेकून मारल्यानंतर देखील पंडितजी रागानेच वधू-वराच्या मित्रांसोबत बोलताना दिसत आहेत.
View this post on Instagram
हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.76 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. पंडिजींनी जे केलं ते योग्य केलं अशी प्रतिक्रिया या व्हिडीओवर अनेक युजर्सनं दिली आहे.