Viral video : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! दोन हरणांची लढाई सुरू असते, तेवढ्यात…

Wild animals : दोघांच्या भांडणात तिसरा फायदा घेऊ शकतो, त्यामुळे काळजीपूर्वक भांडण मिटवायला हवे. असाच एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये दोन हरणांच्या (Deer) भांडणाचा बिबट्या (Leopard) फायदा घेतो.

Viral video : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ! दोन हरणांची लढाई सुरू असते, तेवढ्यात...
दोन हरणांच्या भांडणाचा बिबट्या घेतो फायदाImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 11:39 AM

Wild animals : दोन मांजरांच्या भांडणाचा फायदा एक माकड घेतो, ही कथा तुम्ही ऐकली असेल, ज्यामध्ये भुकेलेल्या मांजरींना खाद्य मिळते, मात्र त्यासाठी ते आपापसात भांडू लागलात. मग एका माकडाला हे प्रकरण मिटवायला सांगितले, पण माकडाने हुशारीने संपूर्ण खाद्य स्वतःच खाऊन टाकले, त्यानंतर मांजरांना उपाशी राहावे लागले. या कथेतून शिकण्यासारखा धडा हा आहे, की दोघांच्या भांडणात तिसरा फायदा घेऊ शकतो, त्यामुळे काळजीपूर्वक भांडण मिटवायला हवे. यासंबंधीच एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये दोन हरणांच्या (Deer) भांडणाचा बिबट्या (Leopard) फायदा घेतो. हा अतिशय धक्कादायक व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की जंगलात हरणांचा कळप आहे, त्यापैकी दोन हरणे काही कारणाने आपापसात भांडू लागतात. लढताना त्यांची शिंगे अडकतात. ती निघण्यासाठी ते खूप प्रयत्न करता, परंतु त्यातून सुटका होऊ शकत नाही. आता याच संधीचा फायदा घेण्यासाठी एक बिबट्या लगेच तिथे पोहोचतो.

हरणांचा करतो पाठलाग

हरणाचे भांडण सुरू असताना बिबट्या त्यांच्या आजूबाजूला फिरत राहतो आणि आपली शिकार केव्हा पकडता येईल या संधीच्या शोधात असतो, परंतु हरणांची शिंगे एकमेकांना अडकल्यामुळे आणि त्यातून सुटका करण्यासाठी तो इकडे तिकडे धावतो. यादरम्यान बिबट्याही त्यांचा पाठलाग करतो. बिबट्या त्यांची शिकार करण्यात यशस्वी होतो, की नाही हे व्हिडिओमध्ये पुढे दाखवण्यात आलेले नाही, मात्र तो ज्या पद्धतीने मागे होता, त्यावरून त्याने एकातरी हरणाला पकडले असावे, असे वाटते.

ट्विटर हँडलवर शेअर

आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, की ‘हरणांची शिंगे एकमेकांच्या भांडणात अडकली. या संधीचा फायदा घेत बिबट्या त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आला. जग पण असेच आहे. परस्पर भांडणात, फायदा दुसरा कोणीतरी घेतो. अवघ्या 35 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 11 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आणखी वाचा :

तोंडात सिगारेट, हातात भू-सुरूंग! युक्रेनमधल्या सामान्य नागरिकांना धोक्यात घालावा लागतोय जीव

महाशिवरात्रीनिमित्त खमंग आणि खुसखुशीत अशा साबुदाण्याच्या ‘या’ पदार्थाचा Video झालाय Viral

बच्चन पांडेचं ‘मार खाएगा’ पाहा Dwayne Bravo स्टाइलमध्ये! Social mediaवर ‘या’ Videoचा धुमाकूळ…

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.