मुंबई : सोशल मीडियावरचे व्हायरल व्हिडीओ (Wildlife Viral Video On Internet) खूप काही शिकवतात. काही प्राण्यांचे व्हिडीओ (animal viral video) इतके व्हायरल झाले आहेत की, लोकांनी ते पुन्हा-पुन्हा पाहिले आहेत. सध्या सोशल मीडियावर (trending video) अशाचं पद्धतीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक गोष्ट पाहायला मिळत आहे की, प्रत्येकाने बिकट परिस्थिती समोर गुडघे टेकण्यापेक्षा सामना करायला हवा. हरीण (DEAR AND CROCODILE VIDEO) पाण्यातून पुढे सरकत असताना जोरात उड्या मारत आहे. त्यावेळी तिच्या मागे मगर लागली आहे. मगरीला पाहून अनेकांना घाम फुटतो. परंतु मगरीचं अनेकांनी कौतुक केलं आहे.
सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ एक मिनिटाचा आहे. नदी पार करीत असलेल्या हरणाच्या पाठीमागे मगर लागली आहे. ज्यावेळी मगर मागच्या बाजूने हरणावरती हल्ला करते. त्यावेळी हरणाने मोठी उडी मारली आहे आणि त्याच्या तावडीतून सुटका करुन घेतली आहे. व्हिडीओ पाहत असताना एकवेळं असं वाटतं आहे की, मगर हरणाची शिकार करेल. परंतु हरणाच्या चलाखपणामुळे मगरीने सुध्दा हार मानली आहे. मगरीच्या हल्ल्यानंतर हरणाने जोरात उड्या मारत प्रवास केला आहे. किनाऱ्यावर हरिण पोहोचल्यानंतर धूम ठोकली आहे.
Leap for life…😍 pic.twitter.com/l2kjFA4jWK
— Clement Ben IFS (@ben_ifs) February 7, 2023
हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ एक्स (X) वरती भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी क्लेमेंट बेन (@ben_ifs) यांनी शेअर केला आहे. त्यांनी व्हिडीओ शेअर करीत असताना एक कॅप्शन लिहीलं आहे. आयुष्याची उडी (Leap for life), हा व्हिडीओ आतापर्यंत 3 लाख 45 हजार लोकांनी पाहिला आहे. सात हजारपेक्षा अधिक लोकांनी या व्हिडीओ लाईक सुद्धा केले आहे. त्या व्हिडीओ लोकांच्या अधिक प्रतिक्रिया आल्या आहेत. एक नेटकरी म्हणत आहे की, काय उडी मारली आहे.