या तरूणीच्या कमाईचा सोर्स ऐकून व्हाल हैराण ! टाकाऊ गोष्टी विकून कमावते पैसे
women selling toe nail clippings : पैसे कमवण्यासाठी लोक काय-काय करतील, सांगू शकत नाही. असाच प्रकार अमेरिकेतल्या एक महिलेसोबत घडला आहे. ती टाकाऊ पदार्थांच्या विक्रीमधून महिन्याला बक्कळ कमाई करते. इतकंच नव्हे तर ती टिकटॉकवर व्हिडिओ शेअर करून इतरांनाही असं करायला सांगते
वॉशिंग्टन : सामान्यत: मेकअप केल्यानंतरचा कचरा आपण फेकून देतो, पण एक तरूणी अशी आहे जी, हा कचरा, टाकाऊ पदार्थ तिच्या घरी घेऊन जाते. एवढंच नव्हे तर त्या गोष्टी विकून ती बक्कळ पैसाही कमावते. पायाची नखं (toe nail), कानातला मळ (ear wax) , अगदी शरीरावरचे केस अशा अनेक अजब-गजब वस्तू विकून ती दरमहा लाखो रुपये कमावते. एवढेच नव्हे तर टिकटॉकवर (tiktamericaok) ती इतर महिलांनाही अशा टिप्स देते.
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे राहणारी रिबेका ब्लू नावाची ही तरूणी यापूर्वीही विचित्र कारवायांमुळे चर्चेत आली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, या जगात काहीही निरुपयोगी नसतं, प्रत्येक गोष्ट मौल्यवान आहे, त्याची काही ना काही किंमत असतेच. आपल्याला फक्त त्याची किंमत कशी लावायची ते माहित असणे आवश्यक आहे. काही काळापूर्वी ही महिला अगदी तिची थुंकीसुद्धा विकत होती. एवढं करूनही तिचं समाधान झालं नाही, म्हणून तिने वापरलेला कॉपर टी ऑनलाइन विकायला सुरुवात केली. आता तिने पैसे कमविण्याचा नवा मार्ग शोधला आहे.
दर महिन्याला कमावते 2000 डॉलर्स
रेबेका आता एक्सफोलिएशन (त्वचेची सफाई) केल्यावर निघणारा मळ, पायाची कापलेली नखं, व्हॅक्यूम डस्ट, कानातील मळ आणि अशा अनेक गोष्टी विकते. या विक्रीतून ती दर महिन्यात 2000 डॉलर्स म्हणजे अंदाजे 1.63 लाख रुपये कमावण्याचा दावा करत आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, रिबेकाने NeedToKnow.co.uk ला असे सांगितले की, (या जगात) तुम्ही काहीही विकू शकता तिने आत्तापर्यंत विकलेली सर्वात महागडी गोष्ट म्हणजे एक IUD (कॉपर टी), ज्यामुळे तिला हजारो डॉलर्स मिळवले. रेबेका अनेकदा ती TikTok वर काय विकत आहे याबद्दलचे व्हिडिओ शेअर करते आणि चाहत्यांना तसे (विक्री) करण्यास प्रेरित करते.
अनेक घाण गोष्टी विकल्या
रिबेकाचे Tiktok वर 351,100 फॉलोअर्स आहेत. अनेक लोक तिने दिलेल्या टिप्स देखील वापरतात. तथापि, बहुतेक लोक फक्त तिची मजा घेत असतात. रेबेकाने आतापर्यंत वापरलेले अंडरवेअर, मोजे, पायाची नखे, शरीराचे केस, थुंकी, शरीरातील द्रवपदार्थ, कानातला मळ, कॉटन स्वॅप, कचऱ्याच्या पिशव्या, पँटीलाइनर आणि अगदी वापरलेले फेस मास्क देखील विकले आहेत.
रिबेकाच्या मते, लोक मॉडेलच्या आंघोळीचे पाणी, टॉयलेट स्क्रबर्स, फ्लिप-फ्लॉप आणि मेकअप वाइपसाठी 250 डॉलर्सपर्यंत खर्च करण्यास तयार आहेत. अलीकडील एका व्हिडिओमध्ये, तिने सांगितले होते की तिने पायाच्या नखांचा एक सेट 300 डॉर्लसला विकला होता.