आयला…! केवळ 270 रुपयात विकत घेतली ३ घरं, ते ही या सुंदर देशात…
तुमच्या आमच्यासारखी सामान्य माणसं एक घर घेण्यासाठी अख्खं आयुष्य कष्ट करतो. पण तरीही मनपसंत घर मिळत नाही. मात्र एका महिलेने अवघ्या 270 रुपयांत तीन-तीन बंगले विकत घेतले आहेत.
आजच्या युगात घर घेणं (Buying home) ही कुणासाठीही सोपी गोष्ट नाही. लोक वर्षानुवर्षे कष्ट करतात. प्रत्येक पै-पै वाचवून बचत करायची , त्यानंतरच एखादं लहान घर खरेदी करता येतं. मात्र कॅलिफोर्नियातील एका महिलेने अवघ्या 270 रुपयांत 3 घरं खरेदी ( 3 houses) केली आहेत. हा करार इतका शानदार होता, ती महिला ताबडतोब तिकडे गेली आणि अवघ्या काही तासांत तिने तो सौदा पूर्ण केला..
एवढचं नव्हे तर एवढेच नाही तर ती तेथे पोहोचल्यावर शेजाऱ्यांचे डोळे भरून आले. त्यांनी तिचे मनापासून स्वागत केले. या घराला भव्य आर्ट गॅलरी बनवण्याचा महिलेचा मानस आहे. त्याचे कामही तिने सुरू केले आहे.
कॅलिफोर्नियाची रहिवासी असलेल्या रुबिया डॅनियलने तिची कहाणी शेअर केली आहे. ती म्हणाली, इटलीमध्ये स्वस्त घरे विकली जात असल्याचे पहिल्यांदा ऐकताच मला ते स्वतः पहायचे होते. मला आश्चर्य वाटले की हे कसं खरं असेल. पण मी त्याबद्दल संशोधन केले, शोध घेतला आणि तीन दिवसात तिथे जाण्यासाठी विमानाचे तिकीट खरेदी केले. हे ठिकाण इटलीतील मुसोमेली या छोट्याशा शहरात आहे. हे संपूर्ण शहर भूत बंगल्यासारखे बनत चालले होते, कारण अनेक लोक ते शहर सोडून शहरांकडे धावत होते. सरकारला हे शहरपुन्हा वसवायचे होते , म्हणून तेथील जागा अक्षरश: कवडीमोल भावाने विकली जात होती.
10 दिवसांपर्यंत लोक माझ्यासोबत होते
ब्राझीलच्या ब्राझिलिया येथून 30 वर्षांपूर्वी कॅलिफोर्नियात आलेल्या रुबिया डॅनियलने सांगितले की, या शहराने मला माझ्या बालपणीची आठवण करून दिली. तिथे पोहोचल्यावर शेजाऱ्यांचे डोळे भरून आले. लोक माझे स्वागत करत होते. प्रत्येकाला माझ्यासोबत कॉफी प्यायची होती. तिथे राहणाऱ्या लोकांनी मला बहिणीप्रमाणे मिठी मारली. मी तिथे जवळपास 10 दिवस होते, पण रोज लोक माझ्यासोबत असायचे. मला फक्त शहराच्या समृद्ध इतिहासानेच आनंद झाला नाही तर स्थानिक लोकांनी माझ्यावर केलेले प्रेम देखील मला स्पर्शून गेले. सौरऊर्जेच्या क्षेत्रात काम करणारी डनियल म्हणाली की, मला ही जागा पुन्हा नव्याने बनवायची होते. तिन्ही घरांसाठी माझ्या वेगवेगळ्या योजना आहेत. सध्या मी तिथे एक आर्ट गॅलरी बनवणार आहे जेणेकरुन लोकांना इथे आल्याचा आनंद होईल. सध्या बहुतांश वेळ मी इथेच घालवते.