पोलिसांना फोन करत म्हणाली ‘मला पिझ्झा ऑर्डर करायचाय? मिळेल?’ मग पोलिसांनी चक्क…

यॉर्कशायर पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एका घटना सांगितली आहे, भावनारी आणि पटणारी अशी. यॉर्कशायर पोलिसांना मंगळवारी त्यांच्या आपत्कालीन क्रमांकावर एका महिलेचा फोन आला. पण तिला मदत करताना पोलिसांनी वापरलेली शक्कल म्हणजे माणुसकी जपून घेतलेली काळजी होती.

पोलिसांना फोन करत म्हणाली 'मला पिझ्झा ऑर्डर करायचाय? मिळेल?' मग पोलिसांनी चक्क...
पिझ्झासाठी केलेला फोन यॉर्कशायर पोलिसांनी शक्कल लढवून ओळखला Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 8:50 PM

नवी दिल्लीः एका महिलेने आपत्कालीन क्रमांकांवर (Emergency number) मदतीसाठी फोन केला, मात्र या महिलेने मदतीसाठी फोन केला असला तरी तिने मदत न मागता तिने पिझ्झाची ऑर्डर (Pizza Order) देऊ लागली. तिने पिझ्झा मागितल्यानंतर आपत्कालीन फोन हँडल करणारा ऑपरेटर महिलेवर रागवला नाही. त्यांनी आपली युक्ती वापरुन एक निष्कर्ष काढली की फोन (phone) करणारी महिली बहुतेक कोणत्यातरी संकटात आहे, आणि तिला मदत पाहिजे. ही घटना यॉर्कशायर पोलिसांनी आपल्या ट्विटरवरुन शेअर केली आहे.

समजून घ्या…

यॉर्कशायर पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एका घटना सांगितली आहे, भावनारी आणि पटणारी अशी. यॉर्कशायर पोलिसांना मंगळवारी त्यांच्या आपत्कालीन क्रमांकावर एका महिलेचा फोन आला. आपत्कालीन क्रमांकावर जेव्हा फोन येतो, तेव्हा फोनवरुन बोलणारी व्यक्ती काही ना काही समस्या, अडचणी किंवा मदतीसाठी फोन केलेला असतो. त्यादिवशीही त्या महिलेचा फोन आल्यावर पलिकडून महिला बोलू लागली, त्यावेळी तिला पोलिसांनी विचारले की, तुमची काय समस्या आहे किंवा तुम्हाला काही अडचण आहे का ? त्यावेळी पलिकडील महिलेने मदत न मागता पोलिसांकडे पिझ्झाची मागणी केली. पोलिसांना ती विचारू लागली की, तुमच्याकडे पिझ्झा मिळतो का? हा तिचा प्रश्न ऐकून बोलणाऱ्या पोलिसाने फोन कट केला नाही, पण तिच्याबरोबर आपलं बोलणंही त्यांनी थांबवलं नाही. बोलणं सुरुच ठेवलं. पिझ्झा मिळतो की नाही या प्रश्नाचं उत्तर त्यांनी काय दिलं माहिती नाही पण त्यांनी तिला विचारलं की, आता मी तुम्हाला प्रश्न विचारेन त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही हो किंवा नाही या दोन शब्दातच द्यायचं.

पोलीसांचे सवाल जवाब

पोलिसांनी प्रश्न विचारला की, तुम्हाला काही अडचण किंवा समस्या आहे का? त्यानंतर महिलेने हो म्हणून सांगितले. तिने हो म्हणताच पोलीस सावध झाला आणि तिच्या न कळत आपत्कालिन सेवा देणाऱ्यांना अलर्ट राहायला सांगितले. महिलेबरोबर बोलता बोलता त्या महिलेचे लोकेशनची माहितीही त्या पोलिसांनी घेतली, आणि पोलिसांची एक टीम ज्या ठिकाणी ती महिला होती, त्या ठिकाणी पाठवली. खरं तर ती महिला एका बसमधून जात असताना तिच्या बरोबर प्रवास करणाऱ्या व्यक्तीपासून ती संकटात होती.

धोका पोलिसांनी ओळखला

महिलेने सांगितलेल्या लोकेशनवर पोलीस जेव्हा पोहचले तेव्हा तिच्यासोबत प्रवास करणाऱ्या सहप्रवाशाला अटक केली गेली. त्यानंतर त्याची चौकशी करुन त्याला सोडून दिले गेले, आणि महिलेलाही पोलिसांनी तिच्या घरापर्यंत तिला सोडून आले. त्यानंत यॉर्कशायर पोलिसांनी ट्विटरवर ही घटना शेअर करताना सांगितले आहे की, पिझ्झासाठी आलेला फोन कधी कधी मदत मागण्यासाठीही असू शकतो.

संबंधित बातम्या 

Yashomati Thakur : 70 वर्षात जे उभा केलं ते 7 वर्षात विकलं, कोल्हापूरच्या प्रचारात यशोमती ठाकूर कडाडल्या

पक्षांतर करण्याच्या Offers 2019 पासून येतायत, पण मी मनसे पक्ष सोडणार नाही -Vasant More

मुंबई महापालिका क्षेत्रातील खासगी शाळांमध्ये राखीव प्रवेशाची ऑनलाईन सोडत प्रक्रिया संपन्न

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.