Ice skating : एकाचवेळी स्केटिंग आणि बॅकफ्लिप, तेही बर्फावर..! पाहा, मुलीचा Viral video

Ice skating : जगात विविध प्रकारचे खेळ आहेत, जे लोकांना खेळायला आवडतात. बर्फावर स्केटिंग करणे इतके सोपे नाही. आजकाल आईस स्केटिंगशी संबंधित एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल (Viral) होत आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

Ice skating : एकाचवेळी स्केटिंग आणि बॅकफ्लिप, तेही बर्फावर..! पाहा, मुलीचा Viral video
बर्फावर अप्रतिम स्केटिंग करताना मुलगीImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 10:59 AM

Ice skating : जगात विविध प्रकारचे खेळ आहेत, जे लोकांना खेळायला आवडतात. तुम्हाला क्रिकेट, फुटबॉल, हॉकी आणि बॅडमिंटन इत्यादी गोष्टी माहित असतील आणि कदाचित खेळल्या असतील, पण तुम्ही कधी आईस स्केटिंग हा खेळ पाहिला आहे का? तुम्ही लोकांना स्केटिंग करताना पाहिले असेल, पण आइस स्केटिंग हा देखील एक खेळ आहे, ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नाही. यात जगभरातील अनेक स्पर्धाही आहेत, ज्यामध्ये विविध देशांतील स्पर्धक भाग घेतात. आइस स्केटिंग म्हणजे बर्फावर स्केटिंग करणे. हा खेळ पाहण्यास खूपच मनोरंजक वाटतो, परंतु बर्फावर स्केटिंग करणे इतके सोपे नाही. आजकाल आईस स्केटिंगशी संबंधित एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल (Viral) होत आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

बर्फावर स्केटिंग

या व्हिडिओमध्ये एक मुलगी आईस स्केटिंग करताना दिसत आहे आणि केवळ स्केटिंगच नाही तर मध्येच बॅकफ्लिप्सही मारत आहे. बॅकफ्लिप मारणे अजिबात सोपे नाही, बर्फावर स्केटिंग करताना हा स्टंट करणे किती कठीण गेले असते याची तुम्ही कल्पना करू शकता, परंतु मुलीसाठी ते अजिबात अवघड नव्हते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की मुलगी स्केटिंग करताना बॅकफ्लिप करते आणि नंतर एक पाय उचलून स्केटिंग सुरू करते. त्यानंतर थोड्याच वेळात ती आणखी काही स्टंट दाखवते, जे खूपच आश्चर्यकारक आहेत. मुलीची ही अप्रतिम प्रतिभा पाहून लोक थक्क झाले.

ट्विटर हँडलवर शेअर

आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला असून कॅप्शनमध्ये एक अद्भुत गोष्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिले, ज्या कामासाठी लोक ‘तुमसे नहीं हो पायेगा’ म्हणतात ते काम करण्यातच सर्वात मोठा आनंद आहे. अवघ्या 9 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 9 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइक देखील केले आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूझरने लिहिले आहे, ‘अद्भुत फुर्ती’, तर दुसऱ्या यूझरने महिलेच्या उत्कृष्ट कौशल्याचे कौतुकही केले आहे.

आणखी वाचा :

Bijlee Bijlee गाण्याची परदेशातही Craze; Violin वाजवून मुलीनं वेधलं सर्वांचं लक्ष

…नाहीतर तोंडावरच आपटला असता, Treadmill म्हणून कशाचा वापर केला या पठ्ठ्यानं? पाहा Viral video

Dahi vada बनवायचा आहे, तो ही 30 सेकंदांत, शक्य आहे? Challenge video होतोय Viral

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.