आजाऱ्यासोबत रहायचचं नाही… पतीला जीवघेणा आजार झाल्यावर तिने त्याची साथच सोडली अन्

नवऱ्याला कॅन्सर झाल्यामुळे त्याची पत्नी फारच अस्वस्थ झाली. तिने पतीची साथ सोडत त्याला घटस्फोटच देण्याचा निर्णय घेतला. यामुळे तिला बरंच काही ऐकूनही घ्यावं लागलं. पण तिने तिचा निर्णय कायम ठेवला. पतीच्या मृत्यूपूर्वीच त्या महिलेने..

आजाऱ्यासोबत रहायचचं नाही... पतीला जीवघेणा आजार झाल्यावर तिने त्याची साथच सोडली अन्
जीवघेण्या आजाराशी लढणाऱ्या पतीला सोडण्याचा निर्णय तिने घेतलाImage Credit source: freepik
Follow us
| Updated on: Jun 22, 2023 | 11:14 AM

लग्न हे (marriage) सातं जन्माचं नात मानलं जातं. सप्तपदी घेताना आयुष्यभर चांगल्या वाईट प्रसंगात एकमेकांना साथ देण्याचे वचन पती पत्नी एकमेकांना देतात. पण एका पत्नीने तिच्या पतीची लग्नानंतर अवघ्या काही वर्षांतच साथ (woman left sick husband) सोडली. आणि तेही तेव्हाच, जेव्हा त्याला तिची सर्वात जास्त गरज होती. जेव्हा तो एका जीवघेण्या आजाराशी झुंज देत होता, तेव्हाच पत्नीने त्याला सोडून जाण्याचा निर्णय घेतला. तो कॅन्सरशी झुंजत होता, मात्र त्याच्यासोबत न थांबता वेगळं होण्याबाबत ती ठाम राहिली. बऱ्याच वर्षांनी तिने याप्रकरणावर मौन सोडलं आहे.

40 वर्षीय याना फ्रायने सांगितलं की 22 वर्षी तिचं लग्न झालं. तेव्हा तिचा पती 37 वर्षांचा होता. ते दोघेही न्यूयॉर्क येथे रहात होते. लग्नानंतर नववधू  याना ही इतर महिलांप्रमाणेच नव्या संसाराची, त्यांचं कुटुंब सुरू करण्याची स्वप्न पहात होती. पण तिच्या पतीला कॅन्सर झाल्याचे समजताच तिची सर्व स्वप्न उध्वस्त झाली.

खऱ्या आयुष्यात आपण आपल्या भविष्यात काय होईल याचा विचारही करू शकत नाही. जेव्हा तुम्ही कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढत असता, तेव्हा भविष्याबद्दल कसा बरं विचार करू शकाल ? असा प्रश्न यानाने विचारला. या गंभीर आजाराबद्दल कळल्यावर लोक गंभीर एक किंवा दोन प्रकारे प्रतिक्रिया देतात, मी ते वेळोवेळी पाहिले आहे. त्यांना फक्त एवढंच दिसत होतं की माझा नवरा त्याच्या दुःखात कसा बुडून गेला होता. आणि दुसरी गोष्ट लोकांना दिसते ती म्हणजे त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या लोकांबद्दल देखील काळजी वाटते. पतीच्या आजाराच्या कठीण काळात, ती कशी होती, कसं स्वत:ला सावरत होती, याची मात्र कोणीच चिंता केली नाही अशी खंत यानाने व्यक्त केली.

पाच वर्षांनंतर घेतला तो कठीण निर्णय

‘आम्ही पतीचे रिपोर्ट्स अनेक डॉक्टरांना दाखवले. पण तेव्हा एकाही व्यक्तीने मदत केली नाही. कोणीही विचारले नाही की तुम्हाला सपोर्ट सिस्टीमची गरज आहे का ? पतीच्या आजारावरचे कॅन्सरचे उपचार सुरूच होते, पण तो आजार वाढतच होता’, असे यानाने रडत रडत सांगितले.

‘ माझा माजी पती जेव्हा कॅन्सरशी झुंज देत होता, तेव्हा त्याला लवकर बरं वाटावं यासाठी, त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी मी नेहमीच प्रयत्न केले, प्रार्थनाही केली. पण जसजशी वर्षे उलटत गेली तसतशी आमच्या आशा धूसर होत गेल्या. मी पाच वर्षे सर्व प्रकारचे उपचार केले, पण नंतर आमच्या नात्यातच अडचण आली. पाच वर्षांनी मी पतीला सोडून जाण्याचा विचार केला. पण तेव्हा मला कळलं की मी त्याला काहीच सांगू शकणार नाही. जेव्हा तुमच्यासमोर कोणी दुर्धर आजाराशी लढत असेल, कणकण मरत असेल तेव्हा तुम्ही त्याच्यासमोर असं काही बोलू शकता का ? नाही ना ! असे यानाने नमूद केले.

तो प्रसंग महत्वाचा ठरला

यानाने सांगितले की, तिच्या एका मित्राने स्वत:चे आयुष्य संपवले होते, त्यानंतर यानाने तिचा निर्णय घेतला. ती म्हणाले, ‘ मित्राच्या मृत्यूनंतर मी प्रथमच कोणाचे तरी अंत्यसंस्कार पाहिले आणि ते अतिशय धक्कादायक होते. आत्महत्या हाच एकमेव पर्याय आहे, असे विचार तेव्हा माझ्या मनात सुरू होते. मात्र त्यापूर्वी माझ्या मनात असा विचार कधीच आला नव्हता. ती खूपच वाईट परिस्थिती होती. तेव्हा मला खऱ्या अर्थाने जाणवलं की जर मी स्वतःला वाचवू शकले नाही तर मी नक्कीच मरेन.

त्या घटनेनंतरच यानाने घटस्फोटासाठी अर्ज केला. पतीला सोडून ती निघून गेली. सुरुवातीला तो (पती) यानाचा विचार करायचा पण घटस्फोटानंतर त्याने फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली.

या निर्णयामुळे यानाला बरंच भलंबुरं ऐकावं लागलं. ते कल्पनेपलीकडचं होतं. ती सोडून गेल्यामुळे तिच्या पतीचे कुटुंबिय अतिशय नाराज झाले होत. अनेक लोक भयंकर मेसेज करायचे. मात्र घटस्फोटानंतर यानाने तिच्या पतीशी संपर्क तोडला, बोलणंही बंद केलं. नंतर तिने दुसरं लग्नही केलं.

फेसबूकवरून तिला समजलं की तिच्या पहिल्या पतीचा मृत्यू झाला आहे. तेव्हा ती सिंगापूरमध्ये काम करत होती. आपल्या पतीला अशा अवस्थेत सोडल्याबद्दल यानाला जराही खेद नाही. उलट, त्याच्या उपचारादरम्यान तिला किती अडचणींना तोंड द्यावे लागले याचा विचार करून तिला स्वतःबद्दलच जास्त वाईट वाटते.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.