आता गं बया… ! ही बाई हाय की मुलं जन्माला घालणारी मशीन; वयापेक्षा पोरच जास्त; 40 वयात 44 मुलांना दिला जन्म
Mariam Nabatanzi : युगांडातील एका महिलेने अनोखा विक्रमच रचलाय म्हणा ना.. तिने वयाच्या 40 व्या वर्षापर्यंत 5-10 तर त्यापेक्षाही जास्त नुलांना जन्म दिला आहे. एवढंच नव्हे तर तिने एकाच वेळेस 5-5 मुलांना जन्माला घातलं.
कम्पाला : आई होणं, हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असते. लग्नानंतर काही स्त्रिया लवकर आई (being mother) होतात तर काही उशीरा हा निर्णय घेतात. पण काही स्त्रिया अशा आहेत ज्या कधीच आई न झाल्यामुळे आयुष्यभर दुःखी राहतात. मात्र आज आपण अशा एका महिलेबद्दल जाणून घेणार आहोत, जिच्याबद्दल ऐकल्यावर ती स्त्री आहे की ‘मुलं जन्माला घालणारी मशीन’? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. कारण या महिलेने 5-10 नव्हे तर तब्बल 44 मुलांना (44 kids) जन्म दिला, तेही वयाच्या चाळीशीपर्यंत. जितकं तिचं वय नाही, त्यापेक्षा जास्त तर तिची मुलं आहेत. आजच्या काळात जिथे सर्वत्र गर्भनिरोधकाची (birth control) चर्चा होत आहे, तिथे 40 मुलांना जन्म देणे आणि त्यांचे संगोपन करणे किती आव्हानात्मक आहे याची आपण कल्पनाही करू शकत नाही.
न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार या महिलेचे नाव मरियम नबतांझी (Mariam Nabatanzi) असे आहे. ती युगांडा या आफ्रिकन देशातील आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या महिलेच्या आयुष्यात आतापर्यंत एकच प्रसंग आला आहे जेव्हा तिने फक्त एका मुलाला जन्म दिला आहे. नाहीतर प्रत्येक वेळी गरोदर असताना तिने किमान दोन मुलांना जन्म दिला आहे.
44 पैकी 6 मुलांचा झालाय मृत्यू
वृत्तानुसार, या महिलेच्या आयुष्यात असे 4 प्रसंग आले आहेत जेव्हा तिने प्रत्येकी पाच मुलांना जन्म दिला आहे. तर पाच वेळा तिने तीन मुलांना आणि चार वेळा जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. मात्र, तिच्या 44 मुलांपैकी 6 मुलांचा काही कारणाने मृत्यू झाला आहे. सध्या ती 38 मुलांचे संगोपन करत आहे, ज्यामध्ये 18 मुली आणि 20 मुले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे ती या सर्व मुलांचे संगोपन एकटीच करत आहे. 2016 मध्ये या महिलेचा नवरा घरातून सर्व पैसे घेऊन पळून गेला होता.
12 व्या वर्षी झाले होते लग्न
न्यूयॉर्क पोस्टनुसार, मेरीचे लग्न अवघ्या 12 व्या वर्षी झाले होते. वास्तविक, तिच्या आई-वडिलांनी तिला लग्नाच्या बहाण्याने विकले होते. अशा परिस्थितीत वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी तिने पहिल्या मुलाला जन्म दिला आणि तेव्हापासून तिने 44 मुलांना जन्म दिला.