चक्क कैद्याच्या प्रेमात महिला जेलर, त्याच्या प्रेमात तिने आयफोन तस्करीही केली, नेमकं प्रकरण काय?

महिला जेलर एम्मा जॉन्सनला डर्बी क्राउन कोर्ट (यूके) न्यायाधीश जोनाथन बेनेट यांनी 15 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती, तर तिला तिच्या नोकरीवरूनही काढून टाकण्यात आले आहे.

चक्क कैद्याच्या प्रेमात महिला जेलर, त्याच्या प्रेमात तिने आयफोन तस्करीही केली, नेमकं प्रकरण काय?
चक्क कैद्याच्या प्रेमात महिला जेलर, त्याच्या प्रेमात तिने आयफोन तस्करीही केली, नेमंक प्रकरण काय?Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 5:49 PM

आजपर्यंत तुम्ही अनेक प्रेम कहानी (Love Story) वाचल्या असतील, ऐकल्या असतील, पाहिल्या असतील. मात्र अशी हटके लव्ह स्टोरी कधीच पाहिली नसेल. एक महिला जेलर (Female Jailer) तिच्याच तुरुंगातील कैद्याच्या (Prisoner) प्रेमात पडली. प्रेमात पडलेल्या एका महिला जेलरने कैद्यासाठी अनेक आयफोनची तस्करी केली. या हटके प्रम काहनीने सध्या खळबळ उडवून दिली आहे. तस्करीचा माल लपवता यावा म्हणून जेलर तिच्या प्रियकराला कारागृहात कधी चेकिंग होणार याची माहितीही देत ​​असे. मात्र भंडाफोड झाल्याने आता ही महिला जेलर स्वतः तुरुंगात शिक्षा भोगत आहे. महिला जेलर एम्मा जॉन्सनला डर्बी क्राउन कोर्ट (यूके) न्यायाधीश जोनाथन बेनेट यांनी 15 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती, तर तिला तिच्या नोकरीवरूनही काढून टाकण्यात आले आहे.

प्रेम मान्य मात्र तस्करी नाही

एम्माचा तुरुंगात असलेला तिचा प्रियकर मार्कस सोलोमन यालाही 13 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायाधीश आपल्या निर्णयात म्हणाले, ‘तुम्ही कैद्याच्या प्रेमात पडला आहात हे मी मान्य करू शकतो,  पण अशाप्रकारे विश्वासाचा गैरवापर होत असताना अशा लोकांनाही शिक्षा होणे गरजेचे आहे, म्हणत तिला दणका दिला आहे.  हे कैदी मोबाईल वापरत असल्याचेही न्यायाधीशांनी सांगितले. या प्रकरणात मोबाईलची तस्करी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

दोघांचे मेसेजही कोर्टात सादर केले

कोर्टात उलटतपासणी दरम्यान जेलर एम्मा जॉन्सन आणि कैदी मार्कस सोलोमन यांच्यात बरीच चर्चा झाल्याचेही समोर आले. मार्कस जेलमध्ये तस्करीचे फोन विकायचा. यातून मिळालेले पैसे जॉन्सनच्या खात्यात गेले असल्याचेही उघड झाले आहे. दोघांचे मेसेज कोर्टात सादर करण्यात आले होते, ज्यामध्ये हे स्पष्ट होते की दोघेही वेगवेगळ्या प्रकारचे आयफोन खरेदी आणि विक्री करण्याबाबत बोलत होते, त्यामुळे हे लव्ह स्टोरीने सुरू झालेलं प्रकरण आता तस्करीपर्यंत पोहोचल्याने जेलरलाचा आता जेलची हवा खावी लागत आहे. या हटके स्टाईल लव्ह स्टोरीची सध्या जगभर चर्चा आहे.

जेलर ते तस्कर

प्रेम हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रेमात माणूस कधी कधी वाट्टेल ते करून जातो, असे प्रकार आधीही आपण अनेकदा पाहिले आहेत. आता या जेलमधील लव्ह स्टोरीने एका महिला जेलरला चक्क तस्कर बनवल्याचा धक्कादायक खुला या दोघांच्या चौकशीनंतर झाला आहे. त्यामुळे त्यांना हे प्रकरण आता आणखी महागात पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.