Video | महिलेने चहात मच्छी टाकून अशी बनविली कडक चहा, की चहाप्रेमी पिसाळले

आजपर्यंत चहाचे निरनिराळे प्रकार तुम्ही पाहीले असतील. परंतू असा चहाचा विचित्र प्रकार कुठे पाहीला नसेल. सोशल मिडीयावर व्हायलर झालेल्या या व्हिडीओने चहाप्रेमींमध्ये खळबळ पसरली आहे.

Video | महिलेने चहात मच्छी टाकून अशी बनविली कडक चहा, की चहाप्रेमी पिसाळले
fish - tea Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Oct 04, 2023 | 3:37 PM

मुंबई | 4 ऑक्टोबर 2023 : चहाचे अस्सल प्रेमी असलेले चहाचे अनेक प्रकार चवीने पित असतात. तंदूर चहापासून ते वेगवेगळ्या फ्लेवर आणि मसाल्याचे चहा पिणारे देखील कमी नाहीत. पावसाळी वातावरण असो की थंडी अगदी उन्हाळा चहाप्रेमींची सकाळ, दुपार आणि संध्याकाळ चहा घेतल्या शिवाय साजरी होत नाही. चहाचा घोट घेतल्या शिवाय सकाळ झाल्या सारखी वाटतंच नाही. गरमागरम वाफाळचा चहा घेतला की माणसाचं डोकं चालू लागते. काही लोकांना तर चहा घेतल्याशिवाय सकाळी पोटही साफ होत नाही. परंतू सोशल मिडीयावर चहावर होणारे अनेक प्रयोग पाहून तुमची चांगलेच सटकेल. आता एका महिलेने तर असा चहा तयार केला आहे की अस्सल चहाप्रेमी खवळले आहेत.

चहा बनविण्याचा एक अजब प्रकार सोशल मिडीया साईट एक्सवर @price_trader_ नावाच्या अकाऊट युजरने शेअर केला आहे. ज्यास पाहून अनेक चहाप्रेमींनी आपले डोकं पकडलं आहे. या पोस्टला कॅप्शन लिहीली आहे की where are Chai lovers ? here is somthing for you या पोस्टला 57 हजाराहून अधिक व्यूज आणि खूपसाऱ्या प्रतिक्रीया मिळाल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे, बस करा बाबानो…पाहून मरु आम्ही ! दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की..मी तर आजपासून चहा पिणे बंद करणार ! तर एका युजरने म्हटले की यांचे बिर्यानीचे पकोडे पाहीले आहेत. बंगाली युट्युबर काहीही मिळवून काहीही बनवू शकतात. तुम्हाला या चहाच्या रेसिपीबद्दल काय वाटते ते कमेंटमध्ये लिहा…

येथे पाहा व्हिडीओ –

या 37 सेंकदाच्या व्हिडीओत चहा शिजताना दिसत आहे. पाणी, दूध आणि चहा पत्ती मिक्स झाल्यानंतर चहा मस्तपैकी उकळत आहे. याच दरम्यान एक महिला त्या उकळत्या चहात एका मासळीचा शेपटीकडील तुकडा टाकते आणि चहा चांगला ढवळते. त्यानंतर हा तुकडा काढते. चहाला ग्लासात गाळून ओतते. नंतर माशाचा तो शिजलेला तुकडा या चहाच्या कपाला सजविण्यासाठी लावते. या क्लिपमध्ये महिला बंगाली भाषेत बोलताना दिसत आहे. मागे तिने चहा बनवितानाचा व्हिडीओ शेअर केला होता. तेव्हा एका युजरने तुम्ही तर बंगाली आहात तर मछलीवाली चाय बनवा अशी कमेंट केली होती. त्यामुळे त्यांनी ही गोष्ट मनावर घेत हा चहा तयार केला आहे. एवढंच नाही त्यांनी,’आणखी कोणता चहा बनवू ? असे युजरना विचारले आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.