दुसऱ्यांच्या नवऱ्यांना फसवून कमाईच कमाई, महिलेचा कारनामा असा की…
एक महिला हनी ट्रॅपचा व्यवसाय करून दुसऱ्यांच्या नवऱ्यांची चाचपणी करते आणि त्यांच्या बायकांना मदत करते. ती या महिलांकडून कॉन्ट्रॅक्ट घेते आणि फ्लर्टी मेसेजेस, व्हाइस नोट्स आणि फोटोज पाठवून पुरुषांची चाचपणी करते. तिचा दावा आहे की, 80% पुरुष या चाचणीत अपयशी ठरतात. तिने हे काम लहानपणापासूनच्या हेरगिरीच्या आवडीपासून सुरू केले आहे आणि आता ते तिचा व्यवसाय बनला आहे.
हल्लीच्या डीजिटलच्या युगात असंख्य फ्रॉड होतात. हनी ट्रॅप हा त्यापैकीच एक. हनी ट्रॅप हा एक प्रकारचा हेरगिरीचा प्रकार आहे. गुप्त माहिती मिळवण्यासाठी हनी ट्रॅपचा वापर केला जातो. बऱ्याचदा लष्करातील जवान, उच्चाधिकारी आणि नेत्यांना हनी ट्रॅपमध्ये फसवलं जातं. काही महिला एक व्यवसाय म्हणून हा प्रकार करतात. अशाच एका महिलेने तिची कहाणी सांगितली आहे. तिच्याबाबतचं ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटेल. दुसऱ्यांच्या नवऱ्यांना फसवून मोठी रक्कम कमावण्याचं काम ही महिला करत आहे.
हनी ट्रॅप करून दुसऱ्यांच्या नवऱ्यांना फसवत असल्याचं या महिलेने सांगितलं. विशेष म्हणजे या कामाचं कॉन्ट्रॅक्ट त्या पुरुषांच्याच बायका देत असल्याचा दावा या महिलेने केला आहे. मला या पुरुषांच्या महिला कॉन्ट्रॅक्ट देतात. त्यानंतर मी कामाला लागते. सुरुवात फ्लर्टी मेसेजने होते. जसं की, तू इतका देखना दिसतोस, असं वाटतं तुझ्यासोबत ड्रिंक करू… त्यानंतर बहुतेक पुरुष माझ्या अदांपुढे घायाळ होतात. त्यानंतर माझ्या कामाचा सिलसिला सुरू होतो.
पुरुष काय करतात?
हनी ट्रॅपची सर्व्हिस देणाऱ्या या महिलेच्या म्हणण्यानुसार, लोकांना भलंही माझं हे काम एखाद्याचा संसार मोडणारं वाटत असेल. पण मी माझ्या कामाप्रती सीरिअस आहे. मी माझं काम प्रामाणिकपणे करते. आपला नवरा किती इमानदार आहे हे माझ्या क्लाइंटला कळावं हा त्यामागचा हेतू आहे. या स्त्रीया मला त्यांच्या साथीबाबत सांगत असतात. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटची थोडी डिटेल्स देतात. त्यानंतर मी माझं काम सुरू करते. मी त्यांच्या पार्टनरला फ्लर्टी टेक्स्ट, व्हाइस नोट्स आणि हॉट फोटोही पाठवते. या पुरुषांनी माझ्या जाळ्यात फसावं आणि त्यांची योग्य चाचणी करता यावी, यासाठी मी हे करत असते.
माझ्या या कामासाठी मी 5,481 रुपये घेते. रोज मला 24 ते 55 वर्षाच्या महिलांकडून अनेक मेसेज येतात. पण ज्यांना खरोखरच मदतीची गरज आहे. त्यांनी योग्य व्यक्तीसोबत आपलं आयुष्य काढलं पाहिजे, अशा क्लाइंटचंच कॉन्ट्रॅक्ट मी घेत असते. दुर्देवाने माझ्या आकड्यांनुसार मला ज्या पुरुषांसाठी हनी ट्रॅप करण्यासाठी सांगितलं जातं, त्यातील 80 टक्के पुरुष माझ्या टेस्टमध्ये फेल होतात.
तिची कहाणी…
या महिलेने तिच्या एका क्लाइंट महिलेची कहाणी शेअर केली. एका व्यक्तीची होणारी बायको तीन महिन्याची प्रेग्नंट होती. त्या उन्हाळ्यात या महिलेचं त्याच्यासोबत लग्न होणार होतं. पण तिला होणाऱ्या नवऱ्याबाबतचा संशय होता. ती माझ्याजवळ आली. तिने मला सर्व काही सांगितलं. त्यानंतर मी तिला मदत केली. अशा क्लाइंटमुळेच मला काम करायला मजा येते. गेल्या तीन वर्षापासून मी हे काम करत आहे. मला पूर्वी हे काम करताना तास न् तास लागायचे. आता मी हे काम काही मिनिटातच करत असते. आता मला कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त दोन आठवड्याचा कालावधी लागतो. साधारणपणे मी माझ्या क्लाइंटला दोन महिन्यातच संतुष्ट करते.
दुर्देवाने, माझ्याकडील आकडेवारीनुसार ज्या पुरुषांना हनीट्रॅप करायला सांगितलं जातं, त्यातील 80 टक्के पुरुष माझ्या टेस्टमध्ये फेल होतात. मी हा व्यवसाय कसा पत्करला असा सवाल तुमच्या मनात आला असेल. पण मला लहानपणापासूनच हेरगिरी करायला आवडायचं. मी नेहमीच माझ्या मित्रांच्या ग्रुपमध्ये विश्वासू राहिले आहे. मी काही मैत्रिणींना त्यांचा बॉयफ्रेंडचं रुप ओळखण्यासाठी मदत करायला सुरुवात केली. त्यानंतर मी ही सवय व्यवसाय म्हणून स्वीकारली, असं ही महिला सांगते.