बॉयफ्रेंडच्या अंडरवेअरवरून भडकली महिला, सोशल मीडियावर हल्ला-गुल्ला
प्रियकराच्या एका सवयीमुळे एक महिला एवढी हैराण झाली, की तिने तो मुद्दा सरळ सोशल मीडियावरच मांडला. त्यावर विविध प्रतिक्रिया आल्या आहेत.
Social Media : आजकाल सोशल मीडियाचा वापर खूप वाढला आहे. लोक त्यावर काहीही पोस्ट्स (posts on social media) करत असतात. असेच एक अतरंगी प्रकरण समोर आले आहे. सोशल मीडियावर एका महिलेने आपल्या प्रियकरासोबतच्या (boyfriend) वादाचा असा मुद्दा उपस्थित केला आहे, ज्याचा कोणी विचारही केला नसेल. या वादाच्या संदर्भात महिलेने लोकांना प्रश्न विचारला की बरोबर कोण आहे? महिलेने Reddit वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की ती दररोज तिचे अंडरवेअर बदलते, परंतु तिचा प्रियकर जेव्हा अंघोळ करतो तेव्हाच अंडरवेअर आणि सॉक्स बदलतो. आमच्यापैकी कोण विचित्र आहे? असा प्रश्न तिने विचारला.
म्हणजे तिच्या प्रियकराने एक दिवस अंघोळ केली नाही तर तो जुनीच अंडरवेअर आणि मोजे घालून फिरतो. “तुम्ही तुमचे अंडरवेअर आणि मोजे दररोज बदलता की फक्त आंघोळ केल्यावर? असा प्रश्नही त्या महिलेने Reddit वर AskUK फोरमवरील एका पोस्टमध्ये (question on post) विचारला.
काही दिवस अंडरवेअर बदलली नाही तर काय बिघडलं ?
त्या महिलेच्या या अतरंगी, अनोख्या पोस्टने खळबळ उडाली आणि लोकांनी भरभरून प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. सुमारे 500 लोकांनी कमेंटमध्ये या विषयावर आपली मते दिली आहेत. अनेकांनी सांगितले की अंडरवेअर रोज बदलणे खूप महत्वाचे आहे, तर काहींनी सांगितले की काही दिवस अंडरवेअर बदलले नाही तर काय फरक पडतो.
‘शी… किती विचित्र आहे हे…’
त्यातच एका व्यक्तीने लिहीलं की, ई…. तुझा बॉयफ्रेंड किती विचित्र आहे. तर दुसर्या महिलेने लिहिले – तो माझ्या प्रियकरासारखाच खूप विचित्र माणूस आहे. माणसाने दिवसातून एकदा तरी आंघोळ केली पाहिजे, जेणेकरून अंघोळ केल्याशिवाय अंडरवेअर बदलण्याची परिस्थिती उद्भवणार नाही. त्याच वेळी, असे बरेच लोक होते ज्यांनी सांगितले की ते दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा आंघोळ करता आणि प्रत्येक वेळी त्यांचे कपडे, अंडरवेअर बदलताततो. आपण हे का करू नये ? असंही त्यांनी विचारल. मात्र अनेकांना ही गोष्ट अजिबात आवडली नाही आणि ते म्हणाले – एकापेक्षा जास्त वेळा आंघोळ का करावी. हा पाण्याचा अपव्यय आहे आणि त्वचेसाठी देखील चांगले नाही, असे मतही लोकांनी नोंदवले.
सोशल मीडिया वर होत्ये अनोख्या मुद्यांवर चर्चा
खरंतर, सोशल मीडियावर असा वैयक्तिक आणि विचित्र मुद्दा उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नाही, तर याआधीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. काही काळापूर्वी अशी एक घटना घडली होती ज्यात एका महिलेने सोशल मीडियावर सांगितले होते की ती तिच्या पतीला घटस्फोट देणार आहे कारण त्याने तिच्या वडिलांसारख्या मांजरीला घरातून हाकलून दिले आहे. खरं तर, ही महिला असे मानत होती की तिच्या पाळीव मांजरीच्या रुपाने तिच्या वडिलांचा पुनर्जन्म घेतला आहे.