बँकेत पैसे भरायला आली अन् व्हायरल झाली… डिपॉझिट स्लीपवर जे लिहीलं.. वाचाल तर पोट धरून हसाल !
सध्याच्या जमान्यात सोशल मीडियाची धूम आहे. अवघ्या एका क्लिकवर सगळं काम, वेगवेगळे फोटो, व्हिडीओ बघता येणं, यामुळे लोकांचा सोशल मीडियाचा वापर बराच वाढला आहे. अनेक वेळा या सोशल मीडियावर बरेच गमतीशी फोटो, व्हिडीओ किंवा रील्स शेअर होतात. जे वाचल्यावर किंवा पाहिल्यावर आपल्याही चेहऱ्यावर हसू फुलतं.
सध्याच्या जमान्यात सोशल मीडियाची धूम आहे. अवघ्या एका क्लिकवर सगळं काम, वेगवेगळे फोटो, व्हिडीओ बघता येणं, यामुळे लोकांचा सोशल मीडियाचा वापर बराच वाढला आहे. अनेक वेळा या सोशल मीडियावर बरेच गमतीशी फोटो, व्हिडीओ किंवा रील्स शेअर होतात. जे वाचल्यावर किंवा पाहिल्यावर आपल्याही चेहऱ्यावर हसू फुलतं. काही गोष्टी तर एवढ्या गमतीशीर असतात की ते पाहून लोकं पोट धरू हसालाच लागतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. तुम्ही तो पाहिलात का ? नाही ना ? मग चला जाणून घेऊया, अशी काय गंमत आहे त्यात ?
हा व्हिडीओ एका बँकेतला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डिपॉझिट स्लिपचा हा फोटो असून ती स्लीप भरताना तिने एक चूक केली आहे. त्याच मजेशीर चुकीचा फोटो आणि व्हिडीओ सध्या सगळीकडे फिरत आहे. खरंतर आपल्यापैकी बहुतांश जण बँकेत जाऊन पैसे भरणे, पैसे काढणे अशा कामं करतात. सध्याचा जमाना ऑनलाइनचा असला तरी बहुतेक लोकं पैसे भरण्यासाठी अजूनही बँकेत जाणं प्रेफर करतात. बँकेत चेक डिपॉझिट करताना किंवा एखादा फॉर्म भरताना अनेकांची रक्कम, बँक अकाउंट नंबर, स्वतःची माहिती लिहीताना अनेक लोकांची त्रेधातिरपीट उडते, काही चुकाही होतात. पण काही वेळा अशा चुका जरा मजेशीरही असतात. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका महिलेने अशीच मजेशीर चूक केली आहे. त्यामुळे सगळेच हसत आहेत.
बँकेत पैसे भरायला आली अन्..
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओ स्टेट बँक ऑफ इंडियाची डिपॉझिट स्लीप दिसत आहे. तेथे एक महिला बँकेत दोन हजार रुपये भरण्यासाठी आली होती. त्यासाठी तिने डिपॉझिट स्लीप घेतली आणि त्यात माहिती भरण्यास सुरुवात केली. स्वत:चं नाव, अकाऊंट नंबर इत्यादी माहिती तिने अचूकरित्या त्या स्लीपवर भरली. पण त्या पण, डिपॉझिट स्लिपमध्ये रकमेचा कॉलम हिंदीमध्ये ‘राशी’ असा लिहिला होता. आणि तिथेच त्या महिला गोंधळली आणि तिने तो भरताना चूक केली. तिने तिथे जे लिहीलं ते पाहून त्या बँकेचे कर्मचारी पण क्षणभरासाठी हबकले आणि नंतर तिने हास्याचा धबधबा फुटला.
नेमकं काय केलं तिने ? पहा व्हिडीओ
View this post on Instagram
संगीता नावाच्या महिलेने स्टेट बँक ऑफ इंडियाची डिपॉझिट स्लिप १८ जून रोजी भरली. तिने तिचा अकाऊंट नंबरही लिहीला. पण त्याच डिपॉझिट स्लिपमध्ये रकमेच्या कॉलममध्ये हिंदी मध्ये ‘राशी’ (amount) असं लिहिलं होते. त्या शब्दामुळे गोंधळलेल्या महिलेने तिथे पैशांच्या रकमेऐवजी स्वतःची राशी (तुला) ( Libra) असं लिहीलं. ही स्लीप तेथील बँक कर्मचाऱ्यानी पाहिल्यावर त्यांनाही हसू फुटलं. या स्लीपचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाला आणि बघता बघता व्हायरलही झाला. @Smartprem19 या व्यक्तीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हीडीओ शेअर झाला असून ‘बँकवाले झाले शॉक’ अशी कॅप्शन लिहीण्यात आली आहे.
तो पाहून अनेकांना हसू फुटलं, तर काहींनी संमिश्र कमेट्स केल्या. त्या वाचून तर अजूनच हसायला येईल. तिची रास तूळ नाही शनी आहे, अशी मजेशीर कमेंट एकाने केली. तर दुसऱ्या व्यक्तीने तिची बाजू सावरून घेतली. चूक त्या महिलेची नाही, बँकेची आहे. धन राशी लिहायला हवं होतं ना त्या स्लीपमध्ये असं त्याने म्हटलंय.