Video: असे देसी जुगाड, जे पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल, भारतात जुगाट टेक्नॉलॉजीची कमी नाही

व्हिडिओमध्ये एका महिलेने तिच्या शेतात पाणी ओतण्यासाठी एक अद्भुत जुगाड केला आहे. हे पाहिल्यानंतर, तुम्हालाही थोडा धक्का बसेल. महिलेचा हा जुगाड सोशल मीडियावर लोकांना खूप आवडत आहे.

Video: असे देसी जुगाड, जे पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल, भारतात जुगाट टेक्नॉलॉजीची कमी नाही
शेतीला पाणी देण्यासाठी महिलेचा देसी जुगाड
Updated on: Oct 12, 2021 | 3:11 PM

भारतात जितके जुगाड होतात, तेवढे कदाचित कुठल्याही देशात होत नसतील. आपला देश ‘जुगाड टेक्नॉलॉजी’चा सर्वाधिक वापर करतो. बऱ्याच वेळा लोक जुगाडने असे पराक्रम करतात, हे पाहून मोठे इंजिनीअर दाताखाली बोटं दाबत राहतात. असंच काहीसे अलीकडच्या काळातही समोर आले आहे. हे पाहिल्यानंतर, तुम्हीही क्षणभर ‘जुगाड टेक्नॉलॉजी’चे चाहते व्हाल. (Women used jugaad technology to pour water in the field )

व्हिडिओमध्ये एका महिलेने तिच्या शेतात पाणी ओतण्यासाठी एक अद्भुत जुगाड केला आहे. हे पाहिल्यानंतर, तुम्हालाही थोडा धक्का बसेल. महिलेचा हा जुगाड सोशल मीडियावर लोकांना खूप आवडत आहे. हेच कारण आहे की, अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर मजेदार कमेंट्स दिल्या आहेत.

पाहा व्हिडीओ:

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला शेताच्या काठावर बसलेली आहे. ती तिच्या दोन्ही हातांनी दोन दोरी खेचत आहे आणि दोरांच्या साहाय्याने एका खड्ड्यात असलेले पाणी, डब्यात भरून शेताच्या दिशेने फेकत आहे. या जुगाडच्या साहाय्याने ती महिला काही मिनिटांत तिच्या शेताला शेकडो लिटर पाणी देते. एवढंच नाही तर या लांब व्हिडिओ क्लिपमध्ये इतर अनेक देसी जुगाड व्हिडिओ आहेत, जे पाहिल्यानंतर तुम्हालाही थोडा धक्का बसेल.

हा मजेदार व्हिडिओ jugaadu_life_hacks नावाच्या पेजने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्याला बातमी लिहीपर्यंत हजारो व्ह्यूज आणि लाइक्स मिळाले आहेत. यासोबतच अनेक लोकांनी त्या महिलेच्या जुगाडचे कौतुकही केले आहे. तसे, तुम्हाला या बाईचा जुगाड कसा वाटला, तुम्ही नक्की कमेंट करून सांगाल.

हेही पाहा:

Video: हत्तीच्या पिलाला Z++ सुरक्षा, रस्त्यावरुन चालणाऱ्या हत्तींच्या कळपाचा व्हिडीओ पाहून नेटकरी खूश

Video: गदा सोडून हातात बंदूक, रावणाचा भांगडा करतानाचा व्हिडीओ पाहून नेटकरी पोट धरुन हसले!