आधी फाटलेल्या जीन्सवरुन मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य, आता जीन्समधील फोटो अपलोड करत महिलांकडून टीका
उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांनी जिन्ससंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर आता सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. (womens ripped jeans tirath singh rawat)
मुंबई : उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत(Tirath Singh Rawat) यांनी जीन्ससंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर आता सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांना रावत यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. फाटलेल्या जीन्स गालून महिला काय संस्कार देणार?, असं वक्तव्य तिरथ सिंह रावत यांनी केलं होतं. (womens uploading their pics on social media with ripped jeans criticizes Tirath Singh Rawat)
सोशल मीडियातून कोणत्या प्रतिक्रिया?
My jeans got torn that it became fashionable. then I realised that I am an employee of a disciplined @DelhiPolice. I am not supposed to wear it. Then I cut it into half pants. मेरी पांच साल पुरानी जीन्स को लाल सलाम। #RippedJeansTwitter #rippedjeans pic.twitter.com/p6uFBLcWuk
— Suren Sharma (@DelhiCopSuren) March 18, 2021
तिरथ सिंह रावत यांनी जीन्ससंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली. अनेकांनी रावत यांच्या वक्तव्याचा निषेध केला. अभिनेत्री गुल पनागनेसुद्धा तिरथ सिंह यांना थेट उत्तर दिले आहे. मी फाटलेली म्हणजेच रिप्ड जीन्स घालण्यासाठी बाहेर काढली आहे, असं गुल पनागने ट्विटरवर म्हटलं आहे. फाटलेली जिन्स घातलून स्त्रिया आपल्या मुलांना चांगले संस्कार कसे देऊ शकतील असे वक्तव्य रावत यांनी केले होते. त्यानंतर गुल पनागने हे ट्विट केले आहे. सोबतच पनागने स्वत:चा आपल्या मुलीसोबत रिप्ड जीन्समधील फोटो पोस्ट केला आहे.
* Takes out ripped jeans.*
— Gul Panag (@GulPanag) March 17, 2021
मोहुआ मोईत्रा यांची टीका
तसेच अनेक नेटकऱ्यांनी तिरथसिंग रावत यांच्यावर थेट टीका केली आहे. याच कारणामुळे ट्विटरवर सध्या #RippedJeans हा हॅशटॅग ट्रेण्डींगवर आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनीसुद्धा तिरथ सिंह रावत यांच्यावर जोरदार निशाषा साधला आहे.”मुख्यमंत्री साहेब तुम्ही राज्य चालवता आणि डोकं फाटलेलं दिसतं?,” असं मोईत्रा यांनी म्हटंलय.
Uttarakhan CM – “NGO chalati ho aur ghutney phatey dikte hai?”
CM saab- State chalatey ho aur dimaag phatey dikte hai?
— Mahua Moitra (@MahuaMoitra) March 17, 2021
तिरथ सिंह रावत काय म्हणाले?
“मी एकदा जयपूरहून येत होतो. तेव्हा काही सहकारी माझ्यासोबत होते. दुसऱ्या दिवशी करवाचौथचा सण होता. माझे काही सहकारी दिल्लीचे होते. ते म्हणाले की, वर्षभर पत्नीला नाराज ठेवतो, मात्र करवाचौथच्या या एका दिवशी तरी त्यांचे मन राखावेच लागेल. मग मी त्यांच्यासोबत दिल्लीला जाण्यासाठी निघालो. ज्यावेळी आम्ही विमानात बसलो तेव्हा माझ्या बाजूला एक महिला बसली होती. मी तिच्याकडे पाहिले तेव्हा खाली गमबूट, आणखी वर बघितलं तर तिच्या गुडघ्यावरची जीन्स फाटली होती, हात बघितले तर त्यामध्ये कडेच-कडे, असा तिचा एकूण अवतार होता,” असं तिरथ सिंह रावत म्हणाले होते.
इतर बातम्या :
Video | बापरे ! केस कापण्यासाठी चक्क चाकू आणि हातोड्याचा वापर, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल
Video | मम्मी-पप्पाच्या लग्नात मुलीचे गोड नखरे, रडून-रडून जिंकलं सर्वांच मन, एकदा व्हिडीओ पाहाच
VIDEO | भंडाऱ्यात एकाच घरी निघाले तीन विषारी साप, पाहा थरारक व्हिडीओ