#INDvPAK : मिताली ब्रिगेडनं 107 धावांनी जिंकला ’11वा खेळ’, सोशल मीडियावर मीम्स शेअर करून चाहत्यांचा विजयोत्सव

ICC Women’s World Cup 2022 : ICC महिला विश्वचषकाचा चौथा सामना 6 मार्च रोजी भारत आणि पाकिस्तान (INDW vs PAKW) यांच्यात खेळला गेला, जिथे मिताली ब्रिगेडने बिस्माह मारूफच्या पाकिस्तानचा (Pakistan) 107 धावांनी पराभव केला. यावर मीम्स व्हायरल होत आहेत.

#INDvPAK : मिताली ब्रिगेडनं 107 धावांनी जिंकला '11वा खेळ', सोशल मीडियावर मीम्स शेअर करून चाहत्यांचा विजयोत्सव
ICC महिला विश्वचषकात पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर चाहत्यांनी शेअर केले मीम्सImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 5:48 PM

ICC Women’s World Cup 2022 : ICC महिला विश्वचषकाचा चौथा सामना 6 मार्च रोजी भारत आणि पाकिस्तान (INDW vs PAKW) यांच्यात खेळला गेला, जिथे मिताली ब्रिगेडने बिस्माह मारूफच्या पाकिस्तानचा (Pakistan) 107 धावांनी पराभव करून ODI विश्वात विजयी सुरुवात केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा भारतीय कर्णधार मिताली राजचा (Mithali raj) निर्णय योग्य ठरला. फॉर्मात असलेल्या सलामीवीर स्मृती मंधाना, स्नेह राणा आणि पूजा वस्त्राकर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने सुरुवातीच्या धक्क्यातून सावरले आणि सात बाद 244 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 43 षटकांत 137 धावांत गारद झाला. सोशल मीडियावर चाहते खूश असून #INDvPAK हा सोशल मीडियावरही टॉप ट्रेंडिंग आहे. या हॅशटॅगवर भारतीय चाहते आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.

भारताचा पाकिस्तानवर सलग 11वा विजय

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा हा पाकिस्तानवर सलग 11वा विजय आहे. या 11 पैकी मिताली राजच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानवरचा हा 10वा विजय आहे.

गुणतालिकेतही मोठी झेप

या विजयासह भारताने आयसीसी महिला विश्वचषकाच्या गुणतालिकेतही मोठी झेप घेतली आहे. भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. पाकिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत केल्यामुळे भारताची निव्वळ धावगती 2.140 आहे. दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ 0.640च्या निव्वळ धावगतीसह दुसऱ्या, ऑस्ट्रेलिया 0.240सह तिसऱ्या आणि वेस्ट इंडिज 0.060सह चौथ्या क्रमांकावर आहे.

आणखी वाचा :

INDvsPAK WWC 2022: ‘या’ चौघींच्या सुपर कामगिरीमुळे वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला चारली धूळ

IND vs PAK, WWC 2022: वर्ल्डकपमध्ये भारतीय महिला संघाच्या वादळासमोर पाकिस्तान उद्धवस्त

IND vs PAK Mithali Raj: पाकिस्तान विरुद्ध खेळताना मिताली राजने रचला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड, सचिन तेंडुलकरशी बरोबरी

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.