केवळ या कारणासाठी युट्युबरने अख्खे शहरच उभे केले, इंटरनेटवर खळबळ

जगातल कधी काय होईल हे सांगता येत नाही आता एका युट्युबरने ११९ कोटी रुपये खर्च करुन अख्खे शहरच वसवलेले आहे.या शहर इंटरनेटवर चांगलेच व्हायरल झालेले आहे...

केवळ या कारणासाठी युट्युबरने अख्खे शहरच उभे केले, इंटरनेटवर खळबळ
Follow us
| Updated on: Dec 12, 2024 | 7:46 PM

सोशल मीडियावर एक खाजगी पद्धतीने वसवलेले शहर अलिकडे खूपच प्रसिद्ध आहे. ज्याबद्दल तुम्हाला प्रचंड आश्चर्य वाटेल. या शहराचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. या शहरास युट्युबरने तब्बल ११९ कोटी रुपये खर्च करुन तयार केलेले आहे. वास्तविक जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या युट्युबर मिस्टर बीस्ट यांनी हे घर बनविले आहे. मिस्टर बीस्ट एक नवा रियालिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. हा रिलालिटी शो १९ डिसेंबर पासून सुरु होणार आहे. याच शो साठी त्यांनी हे शहर वसवलेले आहे. ज्याला पाहून प्रत्येक जण आश्चर्यचकीत झाला आहे.

जिमी स्टीफन डोनाल्डसन ऊर्फ मिस्टर बीस्ट हा जगातला सर्वात श्रीमंत युट्युबर असून त्याच्या युट्युब चॅनलचे तब्बल ३३५  दशलक्ष सब्सक्राईबर्स आहेत. त्यामळे त्याला जगातला सर्वात मोठा युट्युबर का किताब मिळालेला आहे. त्याने नवा रियालिटी शो घोषीत केला आहे. या रियालिटी शोचे नाव ‘बीस्ट गेम्स’ असे ठेवलेले आहे. हा शो येत्या १९ डिसेंबरपासून सुरु होत आहे. या शोसाठी स्टीफन डोनाल्डसन ऊर्फ मिस्टर बीस्ट याने एक स्पेशल सेट तयार केलेला आहे. टोरंटो शहरात हा सेट उभा केलेला आहे. हा सेट एका मिनी सिटी प्रमाणे आहे. ज्याला पाहून सर्वजण हैराण झालेले आहेत.

हे सुद्धा वाचा

येथे पाहा पोस्ट –

शोच्या सेटसाठी किती झाला खर्च ?

जिमी स्टीफन डोनाल्डसन ऊर्फ मिस्टर बीस्ट जगातील सर्वात मोठे युट्युबर असून ते अमेरिकेतील कंसास येथे राहतात. त्यांच्या युट्युब चॅनल्सचे तब्बल ३३५ मिलियन सब्सक्राईबर्स आहेत. त्यांचा नवा रियालिटी शो ‘बीस्ट गेम’ येत्या १९ डिसेंबरला येत आहे. या शोसाठी हा सेट त्यांनी १४ दशलक्ष डॉलर म्हणजेच ११९ कोटी रुपये खर्च करुन तयार केलेला आहे. त्याचे फोटो इंटरनेट व्हायरल होत आहेत. या फोटोंना पाहून एका युजरने लिहीले आहे की केवळ २५ मिनिटांच्या व्हिडीओसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करणे योग्य नाही ! तर युजरच्या या कमेंटला उत्तर देताना मिस्टर बीस्ट यांनी लिहीलेय की हा केवळ २५ मिनिटांचा व्हिडीओ नाही तर संपूर्ण दहा भागांचा शो आहे. ज्यास पुढील आठवड्यापासून एमेझॉन प्राईमवर पाहाता येणार आहे. एका मुलाखतीनुसार या शो तयार करण्यासाठी १०० दशलक्ष डॉलर म्हणजे ( सुमारे ८५० कोटी रुपये ) खर्च झाले आहेत. हे घर इंटरनेटवर ट्रेंड होत आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.