बादलीभर रंगाची काय गरज? टूथब्रशवरील ट्यूब इतक्या कलरने संपूर्ण घराला होईल रंगरंगोटी!
भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ देबाशीश चंद यांनी आपलं रंगाचं संशोधन यशस्वी केलं आहे. त्यांनी असा रंग तयार केला आहे की, चुटकीभर रंग संपूर्ण घराला उरून पुरेल. चला जाणून घेऊयात नेमकं काय
मुंबई : तंत्रज्ञानाच्या युगात बऱ्याच किचकट गोष्टी आता सोप्या झाल्या आहेत. कधी काळी कठीण आणि महाग असलेल्या वस्तू आता स्वस्तात उपलब्ध होत आहेत. असंच काहीसं आता रंगाबाबत होणार आहे. तुम्ही कधी घराला रंगरगोटी करायला घेतली तर खर्च पाहूनच रंग उडून जातो. पण आता शास्त्रज्ञांनी खर्चाचं गणित सोडवलं आहे, असं म्हणायला हरकत नाही. शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात हलका रंग शोधून काढला आहे. इतकंच काय तर 1.36 किलोग्राम पेंटनं संपूर्ण बोईंग 747 विमान रंगवलं जाऊ शकतं. हा रंग ऊन पावसात सहजासहजी उडत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे टिकून राहण्याची क्षमता आहे.
शास्त्रज्ञांनी हा रंग फुलपाखरांच्या पंखांवरील रंगाने प्रेरित होऊन शोधला आहे. यात रंगाऐवजी पिगमेंटचा वापर केला आहे. पेंटमध्ये रंगाऐवजी नॅनोपार्टिकल्स टाकले जातात.या रंगाला शास्त्रज्ञांनी प्लासमोनिक पेंट असं नाव दिलं आहे.
प्लासमोनिक पेंट अनेक रंगांमध्ये तयार गेला आहे. त्यामुळे भविष्यात रंगरंगोटी करणं आणखी स्वस्त होणार आहे. विशेष म्हणजे प्लासमोनिक पेंट सर्व प्रकारची इन्फ्रारेड स्पेक्ट्रम रिफ्लेक्ट कर. त्यामुळे कमी उष्णता खेचते आणि ग्रीन हाऊस गॅसचं उत्सर्जन कमी होऊ शकतं. अन्य रंगांच्या तुलनेत हा रंग 13 ते 16 अंश सेल्सियस थंड असतो.
सध्याचे रंग आर्टिफिशियल सिंथेसाईज करून तयार केले जाता. पण प्लासमोनिक पेंटच्या प्रत्येक कणांमध्ये इलेक्ट्रॉनिक गुणधर्म आहे. किती उष्णता आणि प्रकाश शोषवा हे ठरवते. या पार्टिकल्समुळे हा रंग वजनाने हला आहे. याची जाडी फक्त 150 नॅनोमीटर्स इतकी आहे. यातच हा रंग उरून पुरेल असं म्हणायला हरकत नाही.
प्रोफेसर चंद यांनी सांगितलं की, निसर्गात असंख्य रंग असून प्राणी, पक्षी, मासे आणि फुलपाखरांना दिले आहेत. पण फुलपाखरांचा रंग पाहून मी मोहीत झालो होतो. मला लहानपणापासूनच फुलपाखरू बनवायचे होते. त्यामुळे रंगाचं आकर्षण निर्माण झालं. पेंट इतका हलका आहे की, बोईंग 747 विमान रंगविण्यासाठी सुमारे 1.3 किलो पेंट पुरेसे आहे. असं बोईंग विमान रंगवण्यासाठी साधारण 453 किलोग्राम पेंट लागतो.
हा रंग तयार करण्यासाठी देबाशीष आणि त्यांच्या टीमने इलेक्ट्रॉन बीम एवोपरेटचा वापर केला आहे. त्यामुळे प्रत्येक रंगासाठी वेगवेगळ्या पिगमेंटची गरज भासते. पण हा रंग नुकता प्रयोगशाळेत तयार केल्याने बाजारात येण्यासा बराच अवधी लागू शकतो.