World Tour : 80 दिवसात सात खंड पालथे घातले, 81 वर्षांच्या आज्ज्यांचा पराक्रम
जर तुमच्यात इच्छाशक्ती असेल तर तुम्ही कोणत्याही वयात कोणतेही धाडस करू शकतो. 80 वर्षांच्या दोन आज्जींनी केवळ 80 दिवसात जगप्रदक्षिणा पूर्ण केली आहे.
World Tour : जर तुमच्यात जिद्द असेल तर तुम्हाला जगातील कोणतेही अवघड काम करू शकता. मग तुमचे वय तुमच्या आड येत नाही की तुमची शारीरिक क्षमता. आज तुम्हाला वयाच्या 80 व्या वर्षी जगप्रवास करणाऱ्या दोन आजींची कहाणी ऐकणार आहात. या दोघींची गेल्या 20 वर्षांपासून एकमेकींची मैत्री आहे. दोघींचे पती वारले आहेत. त्यामुळे त्यांनी जग प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. नॉर्थ टेक्सासमध्ये राहणाऱ्या या दोघी जणींचा उत्साह पाहून तुम्हालाही त्यांना सलाम करावासा वाटेल. सॅंडी हेजेलिप आणि अॅली हॅम्बी या दोघींची ही कहाणी प्रेरणादायी आहे.
सॅंडी या पेशाने डॉक्टर आहेत. तर अॅली या डॉक्युमेंटरी फोटोग्राफर आहेत. या दोघी घनिष्ट मैत्रिणी आहेत. न्यूयॉर्क पोस्टच्या बातमीनूसार 23 वर्षांपूर्वी या दोघींची एकमेकींशी ओळख झाली होती. जाम्बिया येथे एका मेडीकल मिशनवर असताना दोघींची भेट झाली होती. त्यानंतर त्याची मैत्री वाढतच गेली.
जेवताना जग फिरण्याची आयडीया सुचली..
दोघी एकत्र जेवत असताना त्यांचा जग फिरायला जाण्याची आयडीया सुचली. त्यांनी ठरविले 80 वयोमान आपण गाठले आहेच तर 80 दिवसात जग फिरण्याचा संकल्प त्यांनी सोडला. मग काय बॅगा भरल्या आणि त्या प्रवासाला निघाल्या. 11 जानेवरीपासून त्यांनी आपल्या प्रवासाला सुरूवात केली. त्यांनी अर्जेंटीना पासून नॉर्थ पोलपर्यंत प्रवास केला. या प्रवासात दोघींनी अशा स्थळांना भेटी दिल्या जेथे सर्वसामान्य पर्यटक जात नाहीत.
त्यांनी प्रवास खर्च वाचविण्यासाठी बचतीचे अनेक उपाय केले. छोट्या हॉटेलात राहील्या. जर तुम्ही फिरायलाच निघाला आहात तर महागड्या हॉटेलात उतरून काय उपयोग. काही वेळा तर वेळ नसल्याने त्या एअरपोर्टवरच झोपल्या. तसेच छोट्या बाजारात पेठेत शॉपिंग केल्याने त्यांना स्वस्तात मस्त वस्तूही विकत घेता आल्या.
या ऐतिहासिक स्थळांना दिल्या भेटी
सॅंडी आणि अॅली यांनी प्रवासात अनेक रहस्यमयी ठीकाणांना भेटी दिल्या. त्यांनी रहस्यमयी ईस्टर बेट पाहीले. याशिवाय त्यांनी नोट्रेडम, बकिंघम पॅलेस आणि रोमन कोलोजियम समेत अनेक ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. आफ्रीकेच्या हॅम्बी झांझीबार बेटावर गेल्या, इजिप्तच्या पिरामिड्सना भेट दिली. अंटार्टीकाला जाऊन बर्फात मस्ती केली तेथे पेंगविन पाहीले. भारत, नेपाळ, बाली, जपान,रोम आणि लंडन आदी देश पाहीले.