जगातल्या सगळ्यात गलिच्छ व्यक्तीचा आंघोळ केल्याने मृत्यू, 67 वर्षांनंतर केली होती पहिल्यांदाच आंघोळ
शरीराची स्वच्छता किती महत्त्वाची आहे हे आपण सर्वच जण जाणतो, मात्र जगातल्या सर्वात घाणेरड्या माणसाचा स्वच्छतेमुळे मृत्यू झाला आहे.
मुंबई, जगात एक अशी व्यक्ती होती ज्याने 10-15 दिवस नव्हे तर तब्बल 67 वर्षे अंघोळ केलेली नव्हती. या व्यक्तीला जगातली सगळ्यात गलिच्छ व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. आता त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे कारणही अजबच आहे. इराणचा रहिवासी असलेला अमू हाजी नावाचा माणूस ‘जगातील सर्वात घाणेरडा माणूस’ (The dirtiest man in the world) म्हणून प्रसिद्ध होता, कारण त्याला आंघोळ करून 67 वर्षे झाली होती. त्याची अवस्था पाहणाऱ्याला अक्षरशः किळस याची. त्याचे झाले असे की, 94 वर्षीय अमू हाजीला पाण्याची खूप भीती वाटत होती. पाण्याने त्याच्या मनात अशी विचित्र भीती निर्माण केली की त्याला वाटले की चुकून कधी आंघोळ केली तर तो आजारी पडेल. मात्र, आता त्याचा मृत्यू झाल्याने त्याची भीती खरी ठरताना दिसत आहे. दक्षिणेकडील फार्स प्रांतातील देगाह गावात त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे ज्याची त्याला भीती होती तेच घडले. 67 वर्षांनंतर त्याने आंघोळ केली आणि त्याचा मृत्यू झाला (Died because of Bath).
ग्रामस्थांनी बळजबरीने आंघोळ घातल्याने प्रकृती खालावली
वृत्तानुसार, काही महिन्यांपूर्वी गावकऱ्यांनी त्याला जबरदस्तीने पकडून बाथरूममध्ये नेले आणि अंघोळ घातली, त्यानंतर त्याची तब्येत बिघडली. 67 वर्षांनंतर प्रथमच आंघोळ केल्यावर त्यांची तब्येत एवढी गंभीर झाली की त्यातच त्याचा मृत्यू झाला.
मेलेल्या प्राण्यांचे खायचा मांस
इराणी मीडियानुसार, अमू हाजी मृत प्राण्यांचे मांस खात असे. याशिवाय वाळलेल्या जनावरांच्या विष्ठेचा वापर करून पाईप सिगारेट बनवून तो प्यायचा. 2013 मध्ये त्यांच्यावर एक डॉक्युमेंट्रीही बनवण्यात आली होती, ज्यामध्ये त्यांच्या आयुष्याशी संबंधित सत्य सांगण्यात आले होते.