Viral : स्विमिंग पूल, हेलिपॅडसह काय काय सुविधा आहेत ‘या’ कारमध्ये? पाहा, जगातली सर्वात लांब कार
World's longest car : जगातील सर्वात लांब (Longest) कारच्या यादीत अमेरिकन ड्रीम कारचा (American dream car) समावेश करण्यात आला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही (Guinness World Records) नोंदवले गेले आहे.
World’s longest car : कार किंवा आपल्या घरगुती एखाद्या वाहनात साधारणपणे 4-5 लोक आरामात बसू शकतात. पण तुम्ही असे वाहन पाहिले आहे, का ज्याच्या आत स्विमिंग पूल आहे, छतावर हेलिपॅड आहे. एवढेच नाही तर डझनभर लोकांना बसण्यासाठी जागा असावी. तुमचे उत्तर बहुधा नाही, असे असेल. चला तर, आम्ही तुम्हाला अशा कारबद्दल सांगतो ज्यामध्ये हे सर्व फीचर्स आहेत. आम्ही अमेरिकन ड्रीम कार (American dream car) नावाच्या कारबद्दल बोलत आहोत. जगातील सर्वात लांब (Longest) कारच्या यादीत या कारचा समावेश करण्यात आला आहे. या कारची लांबी 100 फूट आहे. 26-व्हील ड्राइव्ह कारला स्विमिंग पूल आणि हेलिपॅडदेखील आहे. अमेरिकन ड्रीम कारचे नाव यापूर्वीच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness World Records) नोंदवले गेले आहे. पण आता त्यांनी आपलाच जुना रेकॉर्ड मोडला आहे.
वाढवली कारची लांबी
या कारची लांबी 60 फूटांवरून 100 फूट करण्यात आली आहे. ही कारही 1.5 इंच रुंद आहे. या कारमध्ये एकूण 26 चाके आहेत. या कारमध्ये एकावेळी एकूण 75 लोक बसू शकतात, असे सांगण्यात येत आहे. द अमेरिकन ड्रीम 1986मध्ये कॅलिफोर्निया, यूएसए येथील कार कस्टमायझर जे ओहरबर्ग यांनी तयार केले होते, डेली स्टारनुसार, त्याची लांबी 60 फूट होती. नंतर विश्वविक्रम करण्यासाठी त्यांनी ती 100 फुटांपर्यंत वाढवली. अनेक हॉलिवूड चित्रपटांमध्येही ही कार दाखवण्यात आली होती.
केला पैसा खर्च
एक काळ असा होता, की ही कार पूर्णपणे भग्नावस्थेसमान होती, परंतु नंतर एका संग्रहालयाचे मालक असलेल्या मायकेल मॅनिंग नावाच्या व्यक्तीने तिचा पुनर्विकास केला. ही कार रिस्टोअर करण्यासाठी त्यांनी खूप पैसा खर्च केला. ते नंतर फ्लोरिडाच्या डेझरलँड पार्क कार म्युझियमचे मालक मायकेल डेझर यांनी विकत घेतले आणि तिला भेट देण्यालायक बनवले.