हे आहे जगातील सर्वात महागडं केळ; किंमत तब्बल 8 कोटी रुपये, असं काय आहे खास?
एका केळाची किंमत जास्तीत जास्त किती असू शकते, पाच रुपये, सहा रुपये जास्तीत जास्त दहा रुपये. जर तुम्हाला सांगितलं की जगात अशी देखील एक केळी आहे जीची किंमत कोटींच्या घरात आहे तर? तुमचा कधीच विश्वास बसणार नाही.
एका केळाची किंमत जास्तीत जास्त किती असू शकते, पाच रुपये, सहा रुपये जास्तीत जास्त दहा रुपये. जर तुम्हाला सांगितलं की जगात अशी देखील एक केळी आहे जीची किंमत कोटींच्या घरात आहे तर? तुमचा कधीच विश्वास बसणार नाही. तुम्ही विचार कराल की असं या केळीमध्ये काय खास आहे की त्याची किंमत काही कोटींमध्ये असू शकते? आणि एवढी मोठी रक्कम देऊन ही केळी कोण खरेदी करणार?
मात्र न्यूयॉर्क शहरातील एका भिंतीवर चिकटपट्टीच्या मदतीनं एक केळी चिटकवलेली आहे. या केळीचा लिलाव करण्यात येणार आहे. या केळीची किंमत तब्बल 10 लाख डॉलर म्हणजे आठ कोटी रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. टेपच्या मदतीनं चिटकवलेली ही केळी इटलीचा जगप्रसिद्ध कलाकार मॅरिजियो कॅटेलनची एक कलाकृती आहे.ज्या कलाकृतीला त्यांनी कॉमेडियन असं नाव दिलं आहे.त्यांनी ही कलाकृती व्यंगात्मक शैलीमध्ये सादर केलेली आहे.मॅरिजियो कॅटेलनची ही कलाकृती जगभरात चर्चेचा विषय बनली आहे. सोथबी ऑश्कन हाऊच्या माध्यमातून या कलाकृतीचा लीलाव होणार आहे.ही केळी खरेदी करण्यासाठी तुम्ही वीस नोव्हेंबरपर्यंत बोली लावू शकतात.
सोथबी ऑश्कन हाऊसच्या डेविड गेल्परिन यांनी या कलाकृतीबाबत बोलताना सांगितलं की,‘कॉमेडियन’ ही कलाकृती मॅरिजियो कॅटेलनच्या सर्वोत्तम कलाकृतीपैकी एक आहे. त्यामुळेच या आर्ट वर्कची सुरुवातीची बोली एक मिलियन डॉलर एवढी ठेवण्यात आली आहे. त्यांनी याबाबत बोलताना पुढे म्हटलं की, मॅरिजियोच्या काही कलाकृती लीलावामध्ये 142 कोटी रुपयांपर्यंत विकल्या गेल्या आहेत.
मिडिया रिपोर्ट्सनुसार केळीच्या अशा तीन कलाकृती होत्या, त्यातील दोन यापूर्वीच विकल्या गेल्या आहेत. आता ही तिसरी कलाकृती आहे.ज्याची किंमत जवळपास 10 लाख डॉलर म्हणजे आठ कोटी रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.