OMG! तुमच्या पगाराएवढी एका सँडविचची किमत, दोन दिवस आधी द्यावी लागते ऑर्डर… कुठे मिळतं माहित्ये का?
सँडविच खायला कोणाला आवडत नाही ? मऊ लुसलुशीत ब्रेड, त्यावर बटर, चटणी आणि विविध भाज्या, हे कॉम्बिनेशन कोणालाही वेड लावेल. पण....
न्यूयॉर्क : खाणं हा आपला स्थायीभाव आहे. त्यामुळे आपल्याला शक्ती अन् उर्जा दोन्ही मिळते. पण काही लोक असे असतात जे खाण्यासाठी जगतात. त्यांना विविध पदार्थ खायला, नव्या डिशेस ट्राय करायलाही आवडतं. खाण्यापिण्याच्या महागड्या गोष्टींबद्दल तुम्ही ऐकले असेलच. मात्र काही वेळा त्यांच्या अवाजवी किंमतीमुळे भूक मरते. ही नवी बातमीसुद्धा अशाचा एका सँडविचशी (sandwich) संबंधित आहे. साधारणपणे ते 50-100 किंवा 150 रुपयांपर्यंत पर्यंत उपलब्ध असते. पण, न्यूयॉर्कमधील सेरेंडिपिटी 3 (serendipity 3) या रेस्टॉरंटने (restaurant) काही काळासाठी आपल्या मेनूमध्ये खास सँडविच समाविष्ट केले आहे. हे क्विंटेसेंशियल ग्रील्ड चीज सँडविच जगातील सर्वात महाग सँडविच आहे, ज्याची किंमत 214 डॉलर्स म्हणजेच सुमारे 17,500 रुपये आहे.
या रेस्टॉरंटने पहिलेही नोंदवला आहे रेकॉर्ड
या सँडविचमधील खास पदार्थ आणि प्रचंड किंमतीमुळे या सँडविचचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे. हे सँडविच बनवणाऱ्या सेरेंडिपिटी रेस्टॉरंटमध्ये सर्वात महागडे डेझर्ट, सर्वात महाग हॅम्बर्गर, सर्वात महाग हॉट डॉग आणि सर्वात मोठा वेडिंग केक यांचीही नोंद आहे.
View this post on Instagram
खास शँपेन ब्रेडने बनते हे सँडविच
डोम पॅरिग्नॉन शॅम्पेनपासून बनवलेल्या फ्रेंच पुलमन शॅम्पेन ब्रेडचा वापर या सँडविचमध्ये करण्यात येतो. तसेच त्यामध्ये खास प्रकारचे पांढरे ट्रफल बटर घालण्यात आले आहे. यामध्ये अतिशय अनोखे आणि महाग कॅसिओकाव्हॅलो पोडोलिको चीजही(Caciocavallo Podolico cheese)वापरण्यात येते.
आज ऑर्डर केल्यास परवा मिळेल हे सँडविच
या सँडविच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, हे खाण्यासाठी ग्राहकाला किमान 48 तास आधी ऑर्डर द्यावी लागते. तो बनवण्यासाठी इतका वेळ लागतो कारण ते सँडविच बनवण्यासाठी लागणारा माल, सामान हे विविध ठिकाणांहून आणले जाते. स्पेशल चीजमध्ये ग्रिलिंग केल्यानंतर, ते त्रिकोणी आकारात कापले जाते आणि 23k खाण्यायोग्य सोन्याचे फ्लेक्स (edible gold flex) दिले जाते. हे विशेष Baccarat crystal प्लेटमध्ये दिले जाते. तसेच, त्यासोबत ग्लासमध्ये Lobster Tomato Bisque दिले जाते.