Video | ‘या’ तरुणाने अवघ्या 17 सेकंदात सोडवले रूबिक क्यूबचे कोडे, सचिनही झाला फॅन

सचिन तेंडुलकरने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरुन शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.

Video | 'या' तरुणाने अवघ्या 17 सेकंदात सोडवले रूबिक क्यूबचे कोडे, सचिनही झाला फॅन
सचिन तेंडुलकरने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरुन शेअर केला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 4:42 PM

मुंबई : आपल्यापैकी प्रत्येकाने लहाणपणी किंबहुना आताही रुबिक क्युबने (rubik cube) कोडं सोडवण्याचा प्रयत्न केला असेल. अनेक लहान मुलं या रुबिक क्युबन खेळतात. रुबिक क्युबसह खेळाल्याने आपल्या बुद्धिमत्तेचा चांगलाच कस लागतो. काही जण हे कोडे सोडवण्यात यशस्वी ठरतात. तर काही माघार घेतात. पण एका पठ्ठ्याने या क्युबकडे न पाहता कोडे सोडवले आहे. या तरुणाचं नाव मोहम्मद ऐमान कोली असं आहे. यामुळे या तरुणाचा खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) फॅन झाला आहे. सचिनने या तरुणासोबतचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. (young boy solves rubik cube sachin tendulkar share video on instagram)

सचिनने हा व्हिडीओ स्वत मोबाईलच्या फ्रंट कॅमेराने शूट केला आहे. एकूण 1 मिनिट 12 सेंकदाचा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये या पठ्ठ्याने अवघ्या 17 सेकंदामध्ये हे कोडं सोडवून दाखवलं. यामुळे सचिन आणखी प्रभावित झाला.

“काही काळापूर्वीच तरुणाची आणी माझी भेट झाली होती. या तरुणाने त्या क्युबकडे न पाहता त्याने कोडं सोडवलं. यामुळे मी चकित झालो. आपल्याला हे कोडं पाहून सोडवता येत नाही” असं सचिन या व्हिडीओमध्ये म्हणत आहे.

या तरुणाचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे. यावरुन या तरुणाची हुशारी आपल्याला लक्षात येईल. यामुळे या तरुणाचा आपल्या अभिमान वाटेल. सचिनने शेअर केलेला व्हिडीओ अवघ्या 1 दिवसात 10 लाखांपेक्षा अधिक जणांनी पाहिला आहे.

अन रिक्षावाल्याने सचिनला रस्ता दाखवला

दरम्यान काही महिन्यांपूर्वी सचिनने मराठमोळ्या रिक्षावाल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये सचिन रस्ता भरकटला होता. त्यावेळेस त्या रिक्षाचालकाने सचिनला रस्ता दाखवला होता. त्यावेळी कांदिवली पूर्व परिसरात सचिन रस्ता चुकला होता. तेव्हा रिक्षावाल्याने रिक्षा सचिनच्या गाडीच्या पुढे ठेवत त्याला मुख्य रस्त्यावर आणून सोडले होते.

संबंधित बातम्या :

सचिन तेंडुलकर रस्ता चुकला, रिक्षावाला म्हणाला, ‘फॉलो मी’; व्हिडीओ व्हायरल

सचिनसोबत कसोटी पदार्पण, वयाच्या 28 वर्षी क्रिकेटला रामराम, ‘या’ खेळाडूला वाढदिवशीच कोरोनाची लागण

(young boy solves rubik cube sachin tendulkar share video on instagram)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.