धावत्या कारवर तरुणाचे पुश अप, पोलीसांनी मग जे केले..
हल्ली तरुणांकडून कार किंवा बाईक चालविताना वाहतूकीचे नियम पायदळी तुडवित स्टंटबाजी केली जात आहे. अशा प्रकरणात आरोपींवर केवळ दंडात्मक कारवाई केली जात आहे. वास्तविक अशा प्रकरणात वाहतूक परवाना कायमचा रद्द करण्यासारखी केली पाहीजेत...
नवी दिल्ली : वाहन चालवताना जीव धोक्यात घालून स्टंट करण्याचा तरुणांचा उपदव्याप त्यांच्या स्वत:च्या जीवाबरोबर इतरांचा प्राण देखील धोक्यात घालू शकतो. हे माहीती असतानाही अनेक जण वाहन चालविताना वाहतूकीचे नियम सर्रास तोडताना दिसत आहेत. त्यामुळे आता अशा स्टंटबाजांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. असा एका कारवर तरुणाने पुशअप केल्याचा व्हिडीओ गुरूग्राममध्ये व्हायरल झाला होता. या प्रकरणात पोलीसांनी नंबरप्लेटवरून कारमालकाचे जबरदस्त चलान कापले आहे. आणि तपास सुरु केला आहे.
राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्रामच्या सायबर हब जवळ चालत्या कारमध्ये तरुणांचा एक गट स्टंटबाजी करताना आढळला आहे. हे तरूण दारूच्या नशेत कारच्या छतावर स्टंटबाजी करताना दिसत आहेत. त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ समोर येताच कारच्या नंबरप्लेटवरुन मालकाचा शोध घेत त्याला 6 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांचा शोध घेण्यास पोलीसांनी सुरुवात केली आहे.
हा व्हिडीओ रात्रीचा असून व्हिडीओत अल्टो कारच्या छतावर एक तरूण पुशअप करताना दिसत आहे. तर त्याचे दोन साथीदार कारच्या खिडकीतून लटकत गोंधळ घालताना दिसत आहेत. या तरुणांना स्वत:च्या जीवाची पर्वा आहे ना इतरांच्या असे त्यांचे वर्तन दिसत आहे. हा व्हिडीओ गुरुग्रामच्या सायबर हब परिसरातील दिसत आहे.
येथे व्हिडीओ पाहा…
This insedend happened was Last night recorded by famous YouTuber please verify and take action @gurgaonpolice No – HR 72F6692@PoliceHaryana @TrafficGGM @DGPHaryana pic.twitter.com/AZL0Gp8cfZ
— Nikhil PhadTare -Deshmukh??? (@nikhil9296) May 30, 2023
हुल्लडबाजी करणाऱ्या कारचा पाठलाग करणाऱ्या गाडीतून हा व्हिडीओ चित्रीत केल्याचे दिसत आहे. त्यांनी हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केल्यानंतर पोलीसांनी हालचाल करीत कारवाई प्रारंभ केली आहे. व्हिडीओवर आधारीत पोलीसांनी अज्ञात तरुणांवर केस दाखल केली आहे. कारच्या मालकाविरोधात 6,500 रुपयांची पावती फाडण्यात आली आहे. डीसीपी विरेंद्र विज यांनी म्हटले आहे की डीएलएफ फेज – 3 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. व्हिडीओ आणि सीसीटीव्ही आधारे तसेच कारमालकाकडून आरोपीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न असून लवकरच त्यांना अटक होईल असेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.