जिंदगी दो पल की…आनंद महिंद्रांनी बर्फाच्या पुतळ्यांचा फोटो शेअर करत आनंदी जीवनाचा दिला मूलमंत्र
नवी दिल्लीः ज्येष्ठ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक फोटो शेअर करत त्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, हा एक वेगळा आणि मोठा अर्थ सांगणारा असा फोटो आहे. आयुष्याचा विचार, आणि मत समजून घेण्यासाठी तो योग्यच आहे. या पृथ्वीवरील तुमचे जीवन आनंदी करा, कारण हा फक्त एक छोटासा प्रवास आहे. महिंद्रा यांच्या या ट्विटवर एका यूजरने […]
नवी दिल्लीः ज्येष्ठ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक फोटो शेअर करत त्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले आहे की, हा एक वेगळा आणि मोठा अर्थ सांगणारा असा फोटो आहे. आयुष्याचा विचार, आणि मत समजून घेण्यासाठी तो योग्यच आहे. या पृथ्वीवरील तुमचे जीवन आनंदी करा, कारण हा फक्त एक छोटासा प्रवास आहे. महिंद्रा यांच्या या ट्विटवर एका यूजरने लिहिले आहे की, आयुष्य दोन क्षणांचे आहे, त्यामुळे ते पूर्णपणे जगा. त्यापुढे जाऊन त्यांनी सांगितले आहे की, आयुष्य खूप लहान आहे, ते संपण्यापूर्वीच त्याचा तुम्ही आनंद घ्या असंही त्या ट्विटमध्ये उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केले आणि ते नेहमीप्रमाणे चर्चेत आले आहे. सोशल मीडियावरील अनेक युजर्सनी आयुष्याबद्दलचे हे त्यांचे ट्विट अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे.
जिंदगी दो पल की… इसे जी भर जियो.. #LifeLesson #Zindgi
— भारतीय आशीष ?? (@imAshishLive) July 31, 2022
Powerful image. Perfect for Sunday reflection. Make the most of your time on the planet… it’s only a short trip.. pic.twitter.com/yE5UbbiFTC
— anand mahindra (@anandmahindra) July 31, 2022
खरे तर आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्यांच्या विनोदी आणि चर्चेत राहणाऱ्या ट्विटमुळेही ते खास ओळखले जातात. रविवारीही त्यांनी एक ट्विट केले होते, ज्यामध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला होता. या चित्राचे वर्णन करताना त्यांनी म्हटले आहे की, पृथ्वीवरील तुमचा जास्तीत जास्त वेळ चांगला आणि आनंदी बनवा, हा फक्त कारण हा फक्त एक छोटासा प्रवास असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महिंद्राच्या ट्विटमध्ये काय आहे?
आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोमध्ये काही बर्फाचे पुतळे एका सभागृहात ठेवलेले दिसत आहेत. जे दिसायला मानवी सांगाड्यांसारखे आहेत. म्हणून महिंद्रा यांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, एका इटालियन शिल्पाने प्रदर्शनात बर्फाचे पुतळे ठेवले आहेत. या प्रदर्शनाचे शीर्षक होते- आयुष्य लहान आहे आणि ते वितळण्यापूर्वी त्याचा आनंद घ्या. आयुष्य निघून जाण्यापूर्वी तुम्ही जगा आणि प्रेम करा.
जीवन आनंदी करा…
हे छायाचित्र शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी फोटोला कॅप्शन दिले आहे की, यामध्ये खूप मोठा संदेश आहे, त्याचा विचार करण्यासाठी रविवारी हा खास आहे. फोटोतील विचार समजून घेण्यासाठी तुमचे जीवन आनंदी करा कारण आयुष्य हा एक छोटासा प्रवासच आहे.