Dog Bite:जर्मन शेफर्ड कुत्र्याने झोमॅटो डिलीवरी बॉयच्या प्रायव्हेट पार्टला चावा घेतला; पनवेलमधील धक्कादायक घटना

लखनौत एका पिटबिुल जातीच्या कुत्र्याने मालकीणीचे लचके तोडून तिची हत्या केल्याची घटना घडली होती. आता जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्याचा भयानक हल्ला समोर आला. पनवेल मध्ये ही घटना घडलेय. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Dog Bite:जर्मन शेफर्ड कुत्र्याने झोमॅटो डिलीवरी बॉयच्या प्रायव्हेट पार्टला चावा घेतला; पनवेलमधील धक्कादायक घटना
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 6:19 PM

पनवेल : कुत्रा पाळण्याची हौस एका झोमॅटो डिलीवरी बॉयला चांगलीच महागात पडली आहे. जर्मन शेफर्ड कुत्र्याने(German Shepherd dog) झोमॅटो डिलीवरी बॉयच्या(Zomato delivery boy ) प्रायव्हेट पार्टला चावा घेतल्याची धक्कादायक घटना पनवेलमधील(Panvel) एका हाय प्रोफाईल इमारतीत घडली आहे. हा सर्व थराराक प्रकार इमारतीमधील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

लखनौत एका पिटबिुल जातीच्या कुत्र्याने मालकीणीचे लचके तोडून तिची हत्या केल्याची घटना घडली होती. तब्बल तासभर हा कुत्रा मालकिणीचे लचके तोडत होता. अंगावर काटा आणणारा असा हा थरारक प्रसंग होता. आता जर्मन शेफर्ड जातीच्या कुत्र्याचा भयानक हल्ला समोर आला. पनवेल मध्ये ही घटना घडलेय. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

28 ऑगस्ट रोजी ही घटना घडलेय. पनवेलमधील इंडियाबुल्स ग्रीन्स मॅरीगोल्ड सोसायटीत हा थरारक प्रसंग घडलाय. झोमॅटो डिलीवरी बॉयवर जर्मन शेफर्ड कुत्र्याने हल्ला केलाय.

डिलिव्हरी बॉय लिफ्टमधून बाहेर पडत असताना कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. हा डिलिव्हरी बॉय लिफ्टमधून बाहेर पडत असताना कुत्र्याने त्याच्यावर झडप घातली आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टला चावा घेतला.

या हल्ल्यात डिलिव्हरी बॉयच्या प्रायव्हेट पार्टलाही दुखापत झाली आहे. नरेंद्र पेरियार असे जखमी डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. नरेंद्रवर सध्या नवी मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुत्र्याने अचानक हल्ला केल्यामुळे नरेंद्र घाबरला यावेळी इमारतीचा वॉचमन तसेच सोसायटीतील सदस्य त्याच्या मदतीसाठी धावून आले आणि त्याची कुत्र्यापासून सुटका केली.

नरेंद्रवर हल्ला करणारा हा कुत्रा कुणाचा आहे? याबाबत काहीच माहिती मिळू शकलेली नाही. या कुत्र्याच्या मालकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.