नवी दिल्ली | 31 डिसेंबर 2023 : गरीबांची घरं धूरमुक्त करण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गॅस कनेक्शनवर भर दिला. त्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला योजनेची सुरुवात केली. यापूर्वी 50-55 वर्षात केवळ 14 कोटी गॅस कनेक्शन देण्यात आले. म्हणजे पाच दशकांत 14 कोटी गॅस कनेक्शन देण्यात आले होते. त्यानंतर उज्ज्वला योजनेचा विस्तार होत होत तो आता 10 कोटी घरांपर्यंत पोहचल्याचा दावा करण्यात येत आहे. अयोध्येत शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेच्या 10 कोटींव्या लाभार्थ्याला घरी जाऊन या योजनेचा लाभ दिला. तुम्हाला माहिती आहे का हा 10 कोटीवा लाभार्थी कोण आहे ते?
केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्वीट करुन याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, नरेंद्र मोदी यांनी मीरा मांझी यांच्या घरी काल भेट दिली. त्यावेळी त्यांनी त्यांच्या घरी चहापान केले. त्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या 10 कोटीव्या लाभार्थी आहेत. ही केंद्र सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. यामध्ये महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात येते. तर गॅस सिलेंडरमध्ये पण सबसिडीत मिळते.
काय करतात मीरा मांझी
हरदीप सिंह यांनी ट्वीटमध्ये एक व्हिडिओ पण अपलोड केला आहे. त्यात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येतील वीणा चौकात पोहचले. तेथील गरिब वस्तीत राहणाऱ्या मीरा मांझी यांच्या घरी त्यांनी भेट दिली. त्यांच्या घरी चहा घेतला. त्यांच्या कुटुंबियांशी त्यांनी संवाद साधला. मीरा मांझी यांनी त्यावेळी त्या फुल विक्री करत असल्याची माहिती दिली. राम मंदिर झाले तर हा व्यवसाय वाढेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
एका दशकात 18 कोटी नवीन LPG कनेक्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी अयोध्या दौऱ्यावर होते. त्यांनी अनेक विकास कामांचे उद्धघाटन केले. त्यांनी यावेळी देशात गॅस कनेक्शन देण्याचे काम गेल्या 60-70 वर्षांपासून सुरु असल्याचे सांगितले. पण आपले सरकार येईपर्यंत 50-55 वर्षात केवळ 14 कोटी गॅस कनेक्शन देण्यात आले. म्हणजे पाच दशकांत 14 कोटी गॅस कनेक्शन देण्यात आले. तर 2014 साली सत्तेत आल्यापासून 18 कोटी नवीन गॅस कनेक्शन देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या 18 कोटींमध्ये उज्ज्वला योजनेतंर्गत 10 कोटीं गॅस कनेक्शन मोफत दिल्याची माहिती त्यांनी दिली.