Mutual Fund | 10 लाखांचे झाले 2.5 कोटी! परताव्यात या म्युच्युअल फंडाने निफ्टीलाही टाकले मागे

Mutual Fund | म्युच्युअल फंडातील गुंतवणूक शेअर बाजारापेक्षा सुरक्षित असली तरी परतावा मात्र कमी मिळतो. पण या म्युच्युअल फंडने हा गैरसमज असल्याचे सिद्ध केले आहे.

Mutual Fund | 10 लाखांचे झाले 2.5 कोटी! परताव्यात या म्युच्युअल फंडाने निफ्टीलाही टाकले मागे
निफ्टीलाही टाकले मागेImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 3:41 PM

Mutual Fund | म्युच्युअल फंडातील गुंतवणूक शेअर बाजारापेक्षा (Share Market) सुरक्षित असली तरी परतावा मात्र कमी मिळतो. रिस्क फॅक्टरमुळे अनेक गुंतवणूकदार शेअर बाजाराचा रस्ता टाळतात. त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड (Mutual Fund) हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंड शेअर बाजारासोबत बाँड आणि इतर काही मालमत्तांमध्ये गुंतवणूक (Investment) करतात. फंड गुंतवणूकदारांना वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ (Portfolio)तयार करण्यास मदत करते. सोबतच त्यांचे पैसे गमावण्याचा धोका ही कमी करते. परंतु परतावा देण्याच्या बाबतीत म्युच्युअल फंड अनेकदा शेअर बाजारापेक्षा मागे असतात. पण एका फंडने हा गैरसमज असल्याचे सिद्ध केले आहे. या फंडने निफ्टीपेक्षा (Nifty) ही ज्यादा परतावा दिला आहे. हा फंड कोणता आहे? चला तर जाणून घेऊयात.

या फंडने केली ही किमया

ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड कंपनीच्या ICICI प्रुडेन्शियल व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडाने (ICICI Prudential Value Discovery Fund)ही किमया केली आहे. या फंडाने 18 वर्षांत 10 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर सुमारे 2.5 कोटींचा परतावा दिला आहे. फंडाने आता 18 वर्षे पूर्ण केली आहेत. या फंडची व्यवस्थापनाकूल मालमत्ता 31 जुलै रोजीपर्यंत 24,694 कोटी रुपये होती.

ग्राहकांचा विश्वास

मिंटमध्ये प्रकाशित लेखानुसार, म्युच्युअल फंडांच्या या श्रेणीतील एकूण AUM पैकी केवळ ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड कंपनीच्या व्हॅल्यू डिस्कव्हरी फंडाचा वाटा 30 टक्के आहे. हा आकडा या फंडावर ग्राहकांचा किती विश्वास आहे, याची कल्पना देतो. या फंडच्या माध्यमातून अभ्यासपूर्ण गुंतवणूक केली जाते. विविध पोर्टफोलिओच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यात येते.

हे सुद्धा वाचा

हा फंड 16 ऑगस्ट 2004 रोजी सुरू झाला. याने दरवर्षी 19.7 टक्के CAGR वर परतावा दिला आहे. दुसरीकडे, याचकाळात निफ्टी 50 च्या निर्देशांकाने 15.6 टक्के CAGR परतावा दिला आहे. याचा अर्थ असा की जर एखाद्याने निफ्टीमध्ये 10 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याची रक्कम 1.3 कोटी रुपये झाली असती. या योजनेत, 7 वर्षांच्या SIP चा परतावा 15.81 टक्के आहे, 5 वर्षांचा SIP परतावा 18.97 आणि 3 वर्षांचा SIP वर 27.59 टक्के आहे.

काय म्हणतात तज्ज्ञ

आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचे एमडी आणि सीईओ निमेश शाह यांच्या मतानुसार, गेल्या काही वर्षांत भारतीय गुंतवणूकदारांचे मूल्य गुंतवणुकीकडे आकर्षण वाढले आहे. गुंतवणूकदार पूर्वीपेक्षा अधिक जागरूक आहे आणि त्यांना कोठे गुंतवणूक करावी हे समजत आहे. त्यांच्या मते, परदेशात मूल्य गुंतवणूक ही एक प्रस्थापित आणि संशोधन केलेली संकल्पना आहे. आपला ही ग्राहक याबाबतीत मागे नसल्याचे ते सांगतात. मूल्य गुंतवणूक नेहमीच काम करते असे नाही, त्यासाठी गुंतवणूकदारांनी संयम ठेवावा. म्युच्युअल फंडात दीर्घ मुदतीत अधिक फायदा मिळत असल्याचे Iproo चे सीईओ एस. नरेन यांनी मत व्यक्त केले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.