Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baal Aadhaar Card | बोलगोपाळांना मिळाले हक्काचं ओळखपत्र! 16 दशलक्ष बाल आधार कार्ड जारी, आता योजना होणार राष्ट्रीय

Baal Aadhaar Card | देशातील 16 दशलक्ष बालगोपाळांना हक्काचं ओळखपत्र मिळाले आहे. त्यांना बाल आधारकार्डमुळे कोणते फायदे मिळू शकतात, ते पाहुयात.

Baal Aadhaar Card | बोलगोपाळांना मिळाले हक्काचं ओळखपत्र! 16 दशलक्ष बाल आधार कार्ड जारी, आता योजना होणार राष्ट्रीय
बालगोपाळांसाठी आधार कार्डImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 3:44 PM

Baal Aadhaar Card | आधार कार्डला (Aadhar Card) महत्वाचा दस्ताऐवज म्हणून मान्यात मिळाली आहे. देशभरातील 16 दशलक्ष बालकांना (children) आधारची ओळख मिळाली आहे. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (Unique Identification Number) यामुळे मिळाले आहे. मुलांना आधार कार्डशी जोडणारा हा पायलट प्रोजेक्ट (Pilot project) यशस्वी झाल्याने त्याचे रुपांतर आता राष्ट्रीय योजनेत करण्यात येणार आहे. बाल आधार योजना राष्ट्रीय (implemented national wide) होणार आहे. देशातील अनेक नवजात बालकांनाही आधार देण्याचा उपक्रम अनेक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी राबविला होता. त्यानंतर आता या योजनेला व्यापक स्वरुप देण्यात येत आहे. जन्म प्रमाणपत्र जारी झाल्यानंतर आधार क्रमांक प्रदान केला जातो. त्यानंतर वयाच्या पाचव्या वर्षानंतर आधार कार्डचे तपशील अपडेट केले जातात. यासाठी एक पायलट प्रोजेक्ट उत्तर प्रदेशमध्ये सुरू करण्यात आला होता आणि तो यशस्वी ठरला आहे. आता हा प्रकल्प संपूर्ण देशात राबविण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. या योजनेत विशेष निळ्या रंगाचे आधार कार्ड बालकांना देण्यात येते.

अनेक सरकारी योजनांचा फायदा

या योजनेशी संबंधित अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेतंर्गत बाल आधार कार्डद्वारे मुलांना जन्मतःच एक वेगळी ओळख मिळेल. ज्यामुळे त्यांना शाळा पूर्व स्तरावर मिळू शकणारे फायदे देता येतील. त्यांना अनेक सरकारी योजनांचा लाभ घेता येतील. शिवाय, एकदा मूल पाच वर्षांचे झाल्यावर आधारचा पडताळा घेऊन त्याची माहिती अद्ययावत करण्यात येईल. तसेच कार्डचे डुप्लिकेशन होणार नाही याची खात्री यावेळी करण्यात येईल. अधिकार्‍याने सांगितले की, सरकारी योजनांशी निगडित असलेले जवळपास 80 दशलक्ष आधारशी संबंधित व्यवहार दररोज केले जातात.

हे सुद्धा वाचा

आकडेवारी समोर येणार

सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांसाठी आधार आवश्यक आहे. जूनमध्ये आधार नसलेली मुले शाळांमध्ये पोषण आहाराचा लाभ घेऊ शकणार नाही असा अहवाल आल्यामुळे वाद झाला होता. त्यावेळी सरकारने केवळ पालकांच्या आधार कार्डचा अहवाल मागितला, बालकांच्या नाही, अशी पु्स्ती जोडली होती. पण आता योजनांमधील गडबडी रोखण्यासाठी बालकांनाही आधार कार्ड देण्यात येणार आहे. आधार जारी करताना बायोमेट्रिक्सचे संकलन हे प्रमुख वैशिष्ट्ये आहे. ते पाच वर्षांपर्यंतच्या मुलांच्या नोंदणीसाठी जमा केले जात नाहीत. त्यांच्यासाठी आधार नोंदणी चेहऱ्याआधारे आणि वैध आधार कार्ड असलेल्या पालकांच्या किंवा पालकांच्या बायोमेट्रिक प्रमाणीकरणाच्या आधारे केली जाते. बाल आधारसाठी नावनोंदणी करताना नातेसंबंधाचा पुरावा (शक्यतो जन्म प्रमाणपत्र) जमा करण्यात येते. बालकांचे आधार कार्ड निळ्या रंगाचे तयार करण्यात येते. मुलं पाच वर्षांचे होईपर्यंत ते वैध असते.

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.