2000 Rupees Note : गुलाबी नोटा अजूनही घरात? मग वेळ निघून गेल्यावर संधी मिळेल काय

2000 Rupees Note : गुलाबी नोटा अजूनही बाजारात वैध आहेत. निदान एक ते सव्वा महिना या नोटा चलनात आहेत. या नोटांची घरवापसी सुरु आहे. पण कामाच्या गडबडीत तुम्ही या नोटा घरातच तर ठेवल्या नाहीत ना? मग पुन्हा या नोटा बदलण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे का?

2000 Rupees Note : गुलाबी नोटा अजूनही घरात? मग वेळ निघून गेल्यावर संधी मिळेल काय
Follow us
| Updated on: Aug 20, 2023 | 8:51 AM

नवी दिल्ली | 20 ऑगस्ट 2023 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 19 मे रोजी 2000 रुपयांच्या नोटा माघारी बोलावल्या. 23 मे 2023 रोजीपासून बँकांमध्ये या नोटांची घरवापसी संपूर्ण देशात सुरु झाली. 30 सप्टेंबर 2023 रोजीपर्यंत 2000 रुपयांची नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरु राहील. या नोटा अजूनही चलनात आहेत. त्यांची वैधता कायम आहे. कामाच्या गडबडीत तुम्ही पण या नोटा बदलण्याचे टाळले असेल अथवा विसरला असाल तर आता फार अवधी उरलेला नाही. ऑगस्ट महिन्यापासून सणासुदीची धामधूम सुरु होते. या काळात बँकांना सुट्यांचा हंगाम सुरु होतो. त्यामुळे या नोटा बदलण्यासाठी अजूनही बँकांमध्ये मोठी गर्दी झालेली नाही. पण शेवटच्या टप्प्यात अनेकांना जाग आली तर गर्दी होऊ शकते. त्यामुळे आताच गुलाबी नोटा (2000 Rupees Note) बदलून घ्या. कारण या नोटा पुन्हा बदलण्याची संधी मिळणार नाही.

सुट्यांचा मुक्काम

आरबीआयने या नोटा बदलण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 रोजीपर्यंतची वेळ दिली आहे. तुम्ही पण अनेकांसारखं या नोटा शेवटी बदलण्याचा विचार करत असाल तर बँकेत गर्दी होण्याची शक्यता आहे. या ऑगस्ट महिन्यात आता 11 दिवस उरले आहेत. त्यातील 7 दिवस बँकांना सुट्टी आहे. अर्थात सर्वच भागात या सुट्या मिळणार नाहीत. पण अनेक ठिकाणा कामकाजावर त्याचा परिणाम दिसून येईल. सप्टेंबर महिन्यात पण गणेशोत्सव, जन्माष्टमी आणि इतर कारणांमुळे बँकांना सुट्या राहतील.

हे सुद्धा वाचा

या दिवशी बँक बंद

  1. 20 ऑगस्ट- रविवार – सर्वच बँकांना सुट्टी
  2. 26 ऑगस्ट- चौथा शनिवार- सर्वच बँकांना सुट्टी
  3. 27 ऑगस्ट- रविवार- सर्वच बँकांना सुट्टी
  4. 28 ऑगस्ट- सोमवार- ओणम सणामुळे कोच्चीसह परिसरात बँकांना सुट्टी
  5. 29 ऑगस्ट- मंगळवार- केरळमध्ये सुट्टी
  6. 30 ऑगस्ट- बुधवार- रक्षा बंधन देशातील काही भागात बँकांना सु्ट्टी
  7. 31 ऑगस्ट- गुरुवार- रक्षाबंधन आणि श्री नारायण गुरु जयंती निमित्त कानपूर, लखनऊ आणि डेहाराडून येथे सुट्टी

अशा बदलवा नोटा

देशातील नागरिकांना या नोटा खात्यात जमा करा अथवा त्या बदलून घ्या. 30 सप्टेंबरपर्यंत नोट एक्सचेंज करण्याची सुविधा आहे. सार्वजनिक बँका, व्यावसायिक माध्यम केंद्र आणि आरबीआयच्या 19 क्षेत्रीय कार्यालयात या नोटा बदलवून मिळतील.

एका दिवशी इतक्या नोटा बदला

आरबीआयच्या गाईडलाईननुसार, कोणत्याही व्यक्तीला 2000 रुपयांच्या 10 नोटा म्हणजे 20,000 रुपये बदलविता येतील. त्याच्याकडे कोणतीही विचारपूस न करता नोट बदलवून देण्यात येतील. एका दिवशी 20,000 रुपयांपर्यंत नोट बदलता येतील.

व्यावसायिक केंद्रात इतक्या नोटा बदला

बँकांच्या व्यावसायिक ग्राहक केंद्रात किती नोटा बदलता येतील, असा काहींचा प्रश्न आहे. तर या बिझनेस करस्पॉन्डेंट सेंटरवर खातेदाराला 4000 रुपयांपर्यंत नोटा बदलता येतात. कमी नोटा असतील तर बँकेत जाण्याची गरज नाही.

खाते नसताना बदलवा नोटा

बँकेचे खाते नसेल तरीही तुम्हाला 2000 रुपयांच्या नोटा बदलवून मिळतील. तुमच्याकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. एका दिवशी 20,000 रुपयांच्या नोटा बदलवता येतील.

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.