Hallmark Gold : अस्सल सोन्यासाठी खिशावर पडणार भार! हॉलमार्क HUID साठी मोजावे लागले इतके शुल्क
Hallmark Gold : सोने खरेदीदाराला शुद्ध आणि अशुद्ध सोन्यातील फरक माहिती आहे. शुद्ध सोने हे 24 कॅरेट असते. तर त्यात इतर धातू मिळवला तर सोन्याचा दर्जा, प्रत बदलते. दागदागिने तयार करण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करण्यात येतो. यामध्ये 91.66 टक्के सोने असते. पण 24 कॅरेट सोन्यासाठी आता अधिकची रक्कम मोजावी लागणार आहे.
नवी दिल्ली : सोने (Gold) खरेदीदाराला शुद्ध आणि अशुद्ध सोन्यातील फरक माहिती आहे. शुद्ध सोने हे 24 कॅरेट असते. तर त्यात इतर धातू मिळवला तर सोन्याचा दर्जा, प्रत बदलते. दागदागिने तयार करण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करण्यात येतो. यामध्ये 91.66 टक्के सोने असते. शुद्ध सोन्याबाबत केंद्र सरकारने नियम बदलले आहे. 24 कॅरेट सोने अस्सलच मिळावे यासाठी नियम कडक करण्यात आले आहे. आता 24 कॅरेट सोने हॉलमार्क एचयूआयडी (Hallmark HUID) प्रमाणितच मिळणार आहे. येत्या 1 एप्रिलपासून देशात हा नवीन नियम लागू होत आहे. भारतीय मानक ब्यूरोने (BIS) शुद्ध सोन्याची हमी घेतली आहे. पण ग्राहकांना 24 कॅरेट सोन्यासाठी आता अधिकची रक्कम मोजावी लागणार आहे.
24 कॅरेट सोने नाजूक
24 कॅरेट सोने अदिक नाजूक असते. शुद्ध सोने, अस्सल सोने हे 24 कॅरेटच असते. परंतु, या सोन्याचे दागिने तयार होत नाहीत. कारण हे सोने अत्यंत नाजूक आणि नरम असते. सोन्याची आभुषणे आणि दागदागिने तयार करण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करण्यात येतो. यामध्ये 91.66 टक्के सोने असते. 24 कॅरेट सोन्यात शिक्के, हातातील बांगड्या तयार करण्यात येतात.
शुद्ध सोन्यासाठी अधिक रक्कम
24 कॅरेट सोन्यासाठी अर्थातच आता अधिकची रक्कम मोजावी लागणार आहे. हॉलमार्कमुळे ही किंमत वाढणार आहे. खरेदीदारांना फसवुकीपासून वाचविण्यात येत असल्याने त्यापोटी एकप्रकारे शुल्क आकारण्यात येत आहे. एका वृत्तानुसार, चार पीस हॉलमार्कसाठी कमीत कमी 200 रुपये ग्राहकांना शुल्क मोजावे लागेल. तर एका सोन्याच्या तुकड्यासाठी 45 रुपये आणि स्वतंत्र जीएसटी रक्कम द्यावी लागेल. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर आपोआप ताण येणार आहे.
काय आहे हॉलमार्किंग
हॉलमार्किंग हे सोन्याची शुद्धतेची हमी देते. प्रत्येक दागिन्यावर हॉलमार्क चिन्हांकित असतो. त्यामध्ये भारतीय मानक ब्यूरोचा (BIS) लोगो, त्याची शुद्धता याची माहिती अंकित असते. यासोबतच या सोन्याची शुद्धता तपासणी केंद्र आणि इतर माहिती चिन्हांकित असते. प्रत्येक दागिन्यात सोन्याची मात्रा वेगवेगळी असते. दागिन्याची शुद्धता कॅरेट आधारे निश्चित करण्यात येते.
केंद्र सरकारने गेल्या वर्षी 1 जुलै रोजी हॉलमार्किंगच्या नियमात बदल केला होता. हॉलमार्किंगच्या चिन्हांमध्ये बदल केला होता. चिन्हांची संख्या तीन केली होती. पहिले चिन्ह बीआयएस हॉलमार्कचे आहे. हे त्रिकोणी चिन्ह आहे. दुसरे चिन्ह सोन्याच्या शुद्धतेचे आहे. त्यामुळे सोने किती कॅरेटचे आहे, याची माहिती मिळते.
तिसरे चिन्ह हे अल्फान्यूमेरिक कोड असते. हे संख्या आणि अक्षरांचं मिळून तयार झालेलं चिन्हं असते. त्याला HUID चिन्ह म्हणतात. या कोडमध्ये अक्षर आणि संख्येचा समावेश असतो. हॉलमार्किंगच्यावेळी ज्वेलर्सला हा क्रमांक देण्यात येतो. हा क्रमांक युनिक असतो.