Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NLEM | सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात असाध्य रोगांची औषधे, केंद्र सरकारच्या या योजनेमुळे महागडी मेडिसिन स्वस्तात

NLEM | आता सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात असाध्य रोगांवरची औषधे मिळतील. केंद्र सरकारच्या NLEM योजनेमुळे स्वस्तात मेडिसिन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

NLEM | सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात असाध्य रोगांची औषधे, केंद्र सरकारच्या या योजनेमुळे महागडी मेडिसिन स्वस्तात
ही औषधे झाली स्वस्तImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 15, 2022 | 5:30 PM

NLEM | आता सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात (Cheapest Price) असाध्य रोगांवरची Incurable Disease) औषधे मिळतील. आजारपणात सर्वात मोठा खर्च उपचार आणि औषधांवर होतो. त्यामुळे नातेवाईकांची दमछाक तर होतेच, पण रुग्णही हापकी खातो. केंद्र सरकारच्या NLEM योजनेमुळे स्वस्तात मेडिसिन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कंपन्यांच्या मनमानीला चाप

कॅन्सर, मधुमेह, इतर असाध्य रोगांवर इलाज केल्याशिवाय गत्यंतर नसते. उपचार आणि औषधे यावर मोठा खर्च होतो. मेडिसिन उत्पादक कंपन्या फायद्यासाठी या औषधांच्या किंमती वाढवतात. या मनमानीला केंद्र सरकारने चाप लावला आहे.

384 औषधांचा समावेश

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने औषधांची राष्ट्रीय सूची (NLEM 2022) तयार केली आहे. यामध्ये 27 श्रेणींत 384 औषधांचा समावेश करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

7 वर्षानंतर यादी अद्ययावत

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 7 वर्षानंतर औषधांची यादी अद्ययावत (Update) केली आहे. यादीत 34 नवीन औषधांचा समावेश करण्यात आला आहे तर 26 औषधे हटवण्यात आली.

कॅन्सरपासून इतर औषधांचा समावेश

या यादीत कॅन्सर, मधुमेह, अॅन्टिबायोटीक, वॅक्सीन, सिगारेटचे व्यसन सोडवणाऱ्या निकोटीन औषधाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना ही औषधे स्वस्तात मिळतील.

कॅन्सरवरील चार औषधांचा समावेश

बैंडामुस्टिन हाइड्रोक्लोराइड, इरीनोटेकन एचसीआई ट्राईहाईड्रेट, लोनालिडोमाइड आणि ल्यूप्रोलिड एसीटेट ही कॅन्सरवरील चार प्रभावी औषधे आहेत. त्यांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे.

या औषधांना हटवले

पोटातील गॅससंबंधीच्या तक्रारी दूर करणरी गैस्ट्रोइंटेस्टनल, एंटासिड सॉल्ट रैनिटिडिन आणि सुक्रालफेट ही औषधे यादीतून हटवण्यात आली आहे. त्यामुळे ही औषधे महाग होऊ शकतात.

संसर्ग थांबवणाऱ्या औषधांचा समावेश

या यादीत संसर्गाची रोकथाप करणाऱ्या 18 औषधांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे बॅक्टेरिया आणि फंगस या सारख्या संसर्गजन्य आजारांवरील औषधांच्या किंमती कमी होतील.

ही औषधे होतील स्वस्त

कोरोना काळात इवरमेक्टिनचा वापर करण्यात येत होता. हे औषधही आता स्वस्त होईल. इट्राकोनेजोल, मुपिरोसिन, टर्बिनाफिन, डेक्लाटेस्टिवर, मेरोपेनेम, सेफुरोक्साइम, एमिकासिन, बेडाक्विलाइन, डेलामेनिड, एबीसी डोलटेग्रेविर यासारखी संसर्गजन्य आजारावरील औषधांचाही समावेश करण्यात आला आहे.

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.