मुंबई: औरंगाबाद येथील देवदत्त यांच्या गाडीचे एका अपघातात प्रचंड नुकसान झाले, सुदैवाने कार चालवणाऱ्या देवदत्तला फारशी इजा झाली नाही, गाडीचे तीन तेरा वाजले. पण त्याचा जीव वाचला. मोटार विम्याचे वेळेत नूतनीकरण (Vehicle Insurance) केल्यामुळे देवदत्तला गाडीची चिंता नव्हती. मात्र विमा कंपनीने देवदत्तचा दावा फेटाळून (Claim Rejected) लावला. याचे कारण म्हणजे देवदत्तने विम्याचे नूतनीकरण (Insurance Renewal) केले होते, पण अपघाताच्या काही दिवस आधी मुदत संपलेल्या ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण करण्यास तो विसरला होता. देवदत्तप्रमाणेच अनेकदा वाहनचालकांना निष्काळजीपणा आणि इतर चुका भोंवतात. त्यांचा दावा फेटाळण्यात येतो. त्यामुळे दावा फेटाळण्यात येऊ नये यासाठी या गोष्टींची वेळीच पुर्तता करणे आवश्यक आहे. इथे आळस झटकला तर दावा मंजूर व्हायला कुठलाही अडथळा येणार नाही.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॉलिसीचे वेळेत नुतनीकरण करा. दरवर्षी वेळेच्या आधीच विमा संरक्षण घ्या. ॲड ऑन सेवेद्वारे तुमच्या विम्याची व्याप्ती वाढवा. पॉलिसी कायम ठेवण्यासाठी मोटार वाहन अपघात विमा पॉलिसीचे नूतनीकरण वेळेत करा. एकदा प्रीमियम चुकल्यानंतर आपल्या संपूर्ण दावा प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. कारण त्या काळात काही नुकसान झाले तर ते पॉलिसीत समाविष्ट होत नाही.
वैध वाहन परवान्याशिवाय वाहन चालविणे किंवा मद्यपान करून वाहन चालविणे हे मोटार वाहन अपघात विम्यातील दावा नाकारण्याचे सर्वात महत्त्वाचे आणि सर्वसामान्यपणे कारण आहे. जर तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत असाल आणि अपघात झाला, त्यात गाडीचे नुकसान झाले असेल तर विमा कंपनी कायदेशीररित्या तुमच्या नुकसानीचा दावा पूर्ण करण्यास बांधील नाही.
वाहनाचे कालांतराने होणारे बिघाड, रंग उखडणे व टायरमधील दोष हे वाहनातील सामान्य नुकसान मानले जाते. त्यामुळे वाहनाचा विमा दावा दाखल करताना या गोष्टींसाठी दावा केल्यास तो फेटाळला जाईल.
पॉलिसीधारकाने पॉलिसी खरेदी करताना वाहनाशी संबंधित सर्व माहिती अचूकपणे द्यावी. तसेच वाहनाच्या वापराशी संबंधित योग्य माहिती द्यावी. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या व्यवसायासाठी वाहनाचा वापर करत असाल आणि तुम्ही ही माहिती लपवून ठेवली असेल तर अशा वेळी विम्याचा दावा नक्कीच फेटाळला जाईल.
विमा कंपन्या अपघातानंतर दावा दाखल करण्यासाठी तुम्हाला 48 तासांचा अवधी देते. जर आपण दावा नोंदविण्यास उशीर केला तर आपला दावा नोंदवण्यात येतो. याशिवाय तुम्ही विमा कंपनीला निर्धारित मुदतीत आवश्यक ती कागदपत्रे दिली नाहीत, तर तुमच्या दाव्याची नोंद होत नाही.
संबंधित बातम्या:
क्रिप्टोकरन्सीत येऊ देत चढ-उताराच्या लाटा, SIP ची जादू आणले गुंतवणुकीत बहार
PM Kisan : 31 मार्चच्या आत करा आधार केवायसी, अन्यथा रहावे लागेल अनुदानापासून वंचित
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यास किती टॅक्स लागतो; जाणून घ्या परताव्यावरील टॅक्सचे संपूर्ण गणित