Currency Notes : 500 रुपयांच्या नोटेबाबत मोठी अपडेट, आरबीआयने केली भूमिका स्पष्ट
Currency Notes : 500 रुपयांच्या नोटेबाबत मोठी अपडेट. आरबीआयने केली स्पष्ट भूमिका, गदारोळाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने दिले हे उत्तर
नवी दिल्ली : 2016 मध्ये देशात नोटबंदी (Indian Demonetized Currency) लागू झाली. नोव्हेंबर महिन्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर नोटा बदलण्यासाठी जनतेला वेळ देण्यात आला. नोटा बंदी नंतर लांबच लांब रांगा लावून जनतेने त्यांच्याकडील नोटा बदलल्या. त्यानंतरही अनेकदा 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांविषयी बातम्या येऊन धडकल्या. पण अजूनही या दोन्ही नोटांविषयीचा भ्रम पसरलेलाच आहे. आता 500 रुपयांच्या नोटेवरुन गदारोळ सुरु आहे. या गदारोळात केंद्र सरकार (Central Government) आणि आरबीआयने त्यांची बाजू मांडली आहे. नागरिकांमध्ये संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आरबीआयने (RBI) केला आहे.
बाजारात दोन प्रकारच्या नोटा बाजारात सध्या 500 रुपयांच्या दोन प्रकारच्या नोटा आहेत. या दोन्ही नोटांमध्ये फार कमी तफावत आहे. यातील एक नोट नकली असल्याचा दावा करण्यात येत आहे. याविषयीचे व्हिडिओ पण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहते. त्यात अनेक दावे करण्यात येत आहे. त्यात खरी आण खोटी नोट कशी ओळखणार याची खात्री पटवण्याचा दावा करण्यात येत आहे.
व्हिडिओतील दावा काय व्हिडिओत दावा केल्याप्रमाणे तु्म्ही 500 रुपयांची कोणती पण नोट घ्यायला नको. 500 रुपयांच्या नोटेत आरबीआय गव्हर्नरच्या स्वाक्षरी जवळ हिरवी पट्टी नसेल अथवा गांधीजींच्या छायाचित्राजवळ हिरवी पट्टी असेल तर ही नोट न खरेदी करण्याचे आवाहन या व्हिडिओत करण्यात आले आहे. ही नोट नकली असल्याचा दावा करण्यात येत आहे.
आरबीआयचे म्हणणे काय सध्या समाजात खऱ्या नोटेविषयी संभ्रम असतानाच, दुसऱ्या पाचशेच्या नोटेवरुन पण गैरसमज वाढला. त्यामुळे या प्रकरणी अखेर केंद्रीय बँकेला हस्तक्षेप करावा लागला. समाज माध्यमांवर विविध दावे करणारे व्हिडिओ पुर्णपणे खोटे असल्याचे समोर आले. सध्या अस्तित्वात असलेल्या दोन्ही पाचशे रुपयांच्या नोटा या मान्य असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले. यातील कोणती पण नोट तुमच्याकडे असेल तर चिंता न करण्याचे आवाहन आरबीआयने केले आहे. या दोन्ही नोटा चलनात मान्य असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले. दोन्ही प्रकारच्या नोटा बाजारात प्रचलित असून त्या मान्य असल्याचे बँकेने सांगितले आहे.
असा करा पडताळा जर तुमच्याकडेही अशा प्रकारचे खोटे दावे करणारा व्हिडिओ, फेक मॅसेज असेल तर चिंता करु नका. अशा मॅसेजचा पडताळा घ्या. याविषयीचे वृत्त तुमच्याकडे आले असेल, तर ते फॉरवर्ड करण्याऐवजी ते तपासा. असे मॅसेज, व्हिडिओ तुम्ही पीआयबीच्या अधिकृत संकेतस्थळावर, https://factcheck.pib.gov.in पाठवू शकता. यासोबतच पीआयबीच्या व्हॉट्सअप क्रमांक 918799711259 अथवा pibfactcheck@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.