4G पेक्षा 5G महाग; मासिक प्लॅन्सचे दर 10 ते 40 टक्क्यांनी वाढणार, ग्राहकांना बसणार आर्थिक झळ

4G च्या तुलनेत 5G इटंरनेट सेवेच्या दरात मोठी वाढ पहायला मिळण्याची शक्यता आहे. 5G चे रेट हे 4G च्या तुलनेत दहा ते चाळीस टक्क्यांनी अधिक महाग असणार आहेत.

4G पेक्षा 5G महाग; मासिक प्लॅन्सचे दर 10 ते 40 टक्क्यांनी वाढणार, ग्राहकांना बसणार आर्थिक झळ
Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 8:36 AM

मुंबई : केद्र सरकारने 5G स्पेक्ट्रमच्या (Spectrum) लिलावाला (Auction) मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या मार्च 2023 पासून भारतात 5G इंटरनेट सेवेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. 5G चा स्पीड हा 4G च्या तुलनेत तीसपटीने अधिक असणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून नेटकरी 5G च्या प्रतीक्षेत आहेत. आता लवकरच त्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे. मात्र 5G इंटरनेट (Internet) सुविधा वापरताना त्यांच्या खिशावरील ताण देखील वाढणार आहे. 5G इंटरनेटचे दर हे 4G च्या तुलनेत दहापटीने अधिक असणार आहेत. 5G चा मासिक रिचार्ज प्लॅन घेण्यासाठी ग्राहकांना 10 ते 40 टक्क्यांपर्यंत अधिक पैसे मोजावे लागू शकतात. सध्या दूरसंचार क्षेत्रातील अनेक कंपन्या या कर्जबाजारी झाल्या आहेत. तसेच 5G च्या महागड्या स्पेक्ट्रम खरेदीसाठी पैशांची गरज भासणार आहे. यामुळे 5G इंटरनेटचे दर 4G पेक्षा अधिक महाग असणार आहेत. स्पेक्ट्रमचे दर कमी करावेत अशी मागणी देखील काही दिवसांपूर्वी दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांकडून केंद्र सरकारकडे करण्यात आली होती.

4 जी दरात वाढ

दरम्यान काही दिवसांपूर्वीच जवळपास सर्वच दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांनी आपल्या 4जी मासिक प्लॅनचे दर वाढवले आहेत. मासिक प्लॅनच्या दरात 10 ते 15 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना दर महिन्याला अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत. आता पुढील वर्षी ग्राहकांना 5 जीची सेवा देखील मिळणार आहे. मात्र याचे रेट हे 4 जी पेक्षा दहा ते चाळीस टक्क्यांनी महाग असणार आहेत. त्यामुळे जर 5 जी सेवा वापरायची असेल तर ग्राहकांना त्यासाठी अधिक पैसे मोजण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. ज्या देशांमध्ये 5G सेवेला सुरुवात झाली आहे. त्या देशातील मासिक रिचार्ज प्लॅनवर नजर टाकल्यास तेथील 5G चे रेट हे 4G पेक्षा 10 ते 40 टक्क्यांनी महाग असल्याचे दिसून येतात. जगात सर्वात प्रथम 5G सेवा 2018 मध्ये दक्षिण कोरियात सुरू करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

पहिल्या टप्प्यात 13 शहरांमध्ये सुविधा

भारतामध्ये मार्च 2023 पर्यंत 5G सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या 61 हून अधिक देशांमध्ये ग्राहकांना 5G ची सेवा मिळत आहे. लवकरच या देशांमध्ये भारताचा देखील समावेश होणार आहे. देशात पहिल्यात टप्प्यात मुंबई, बंगळुरू, चेन्नई, चंदिगड, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता यासारख्या प्रमुख 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्यात येणार आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.